रस्ता नाही, तर मतदान पण नाही..., दोन हजार नागरिकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 01:22 AM2019-04-15T01:22:26+5:302019-04-15T01:23:06+5:30

कल्याण पश्चिम हा भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो. या भागातील पाच सोसायट्यांना जोडणारा रस्ता अनेक वर्षांपासून विकसित केला नाही.

No road, no polling ..., warning of two thousand citizens | रस्ता नाही, तर मतदान पण नाही..., दोन हजार नागरिकांचा इशारा

रस्ता नाही, तर मतदान पण नाही..., दोन हजार नागरिकांचा इशारा

Next

कल्याण : कल्याण पश्चिम हा भाग भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतो. या भागातील पाच सोसायट्यांना जोडणारा रस्ता अनेक वर्षांपासून विकसित केला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही कल्याण-डोंबिवली महापालिकेने नागरिकांच्या गैरसोयीची दखल घेतली नाही. त्यामुळे या सोसायट्यांत राहणाऱ्या त्रस्त नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तशी तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली असून, आयोगाने त्याची दखल घेतली आहे.
मंगेशी इलाइट डी, मंगेशी फ्लोरा, ओम पॅलेस, गॅलेक्सी रेसिडेन्सी या पाच सोसायट्यांना जोडणारा अंतर्गत रस्ता महापालिकेच्या विकास आराखड्यात आहे. विकास आराखड्यानुसार हा १२ फुटी रस्ता विकसित करायचा आहे. तो विकसित केला नसल्याने नागरिकांना वळसा घालून मुख्य रस्त्याकडे यावे लागते. याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे सोसायट्यांमध्ये राहणाºया दोन हजार नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. तसे निवेदन नागरिकांनी निवडणूक आयोगाला पाठवले होते. आयोगाने त्याची गंभीर दखल घेत हा प्रश्न तातडीने मार्गी लावून, नागरिकांना मतदानावरील बहिष्कारापासून परावृत्त करावे, असे महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांना सूचित केले आहे.
सोसायटीतील रहिवासी विनायक गावडे यांनी सांगितले की, यावेळी नागरिकांना महापालिकेकडून केवळ आश्वासन नको, तर ठोस काम हवे आहे.
>बारावेप्रकरणी आज बैठक
कल्याण-डोंबिवली महापालिकेने बारावे येथे घनकचरा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्याला विरोध करत, बारावे हिल रोड सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या परिसरातील ५२ सोसायट्यांमध्ये राहणाºया २५ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. प्रत्येक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर बहिष्काराचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे या नागरिकांशी चर्चा करण्यासाठी १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासह आमदार नरेंद्र पवार उपस्थित राहणार आहे. या बैठकीतून काही तोडगा निघाला नाही, तर बहिष्काराच्या निर्णयावर नागरिक ठाम आहेत.

Web Title: No road, no polling ..., warning of two thousand citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.