शिपाई भत्त्यासाठी जिल्ह्यातील एकाही शाळेचा अर्ज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:39 AM2021-03-19T04:39:51+5:302021-03-19T04:39:51+5:30

......... * शिक्षणाधिकारी प्रतिक्रिया - जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांच्या शिपाई भत्ता मंजुरीबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र,जिल्ह्यातील या अनुदानित ...

No school in the district has applied for peon allowance | शिपाई भत्त्यासाठी जिल्ह्यातील एकाही शाळेचा अर्ज नाही

शिपाई भत्त्यासाठी जिल्ह्यातील एकाही शाळेचा अर्ज नाही

Next

.........

* शिक्षणाधिकारी प्रतिक्रिया -

जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांच्या शिपाई भत्ता मंजुरीबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र,जिल्ह्यातील या अनुदानित शाळांकडून अद्याप एकही प्रस्ताव आलेला नाही. शासन आदेशानुसार कार्यवाही सुरू केलेली आहे.

- शेषराव बड, शिक्षणाधिकारी, ठाणे

...............

* जिल्ह्यातील अनुदानित शाळा - ४३४

* सध्या कार्यरत असलेले शिपाई - ११०३

* जिल्ह्यातील रिक्त शिपाई पदांची संख्या- ००

............

* संस्था चालकांच्या प्रतिक्रिया -

१) केंद्र शासनाप्रमाणोच या राज्य शासनानेही खाजगीकरण करायला घेतले आहे. मराठी माणसाला मिळणाऱ्या या शिपाई पदाच्या नोकऱ्यांचे खासगीकरण करणे चुकीचे आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने शिपाई पदाच्या भत्त्याचा हा अध्यादेश त्वरित मागे घेण्याची गरज आहे.

- रवींद्र घोडविंदे,

व्यवस्थापक - जीवनदीप शैक्षणिक संस्था, कल्याण.

........

२) शिपाई पद रद्द करणे हे चुकीचेच आहे. प्राथमिक शाळांसाठी तरी या शिपाई पदाची अत्यंत गरज आहे. या अध्यादेशामुळे शिपाई भत्ता मिळणार असला तरी संबंधित व्यक्तीला मात्र नोकरीची हमी नसणार. त्यांचे शोषण होणार नाही या दृष्टीने शासनाने विचार करणे अपेक्षित आहे. अत्यल्प भत्त्यावर सेवा करून घेणे चुकीचे आहे. शासनाने या अध्यादेशाचा पुनर्विचार करावा

- सुलभा कांबळे

संस्थाध्यक्षा- रयत कल्याण सामाजिक संस्था, डोंबिवली.

Web Title: No school in the district has applied for peon allowance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.