आज लस नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:36 AM2021-07-26T04:36:18+5:302021-07-26T04:36:18+5:30
--------------------------------------- ८७ कोरोनाबाधितांची भर कल्याण : कल्याण-डोंबिवलीत रविवारी नव्या ८७ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. रुग्णालयात दाखल असलेले १२५ रुग्ण ...
---------------------------------------
८७ कोरोनाबाधितांची भर
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत रविवारी नव्या ८७ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. रुग्णालयात दाखल असलेले १२५ रुग्ण उपचारांअंती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर नव्या रुग्णांची भर पडल्याने सध्या ८६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजमितीला केडीएमसीच्या हद्दीत एक लाख ३८ हजार रुग्ण आढळून आले आहेत, तर एक लाख ३५ हजार २७४ इतके रुग्ण बरे झाले आहेत.
----------------------------------------
कचऱ्याचे साम्राज्य
डोंबिवली : पूर्वेतील ब्राह्मण सभागृहाच्या पाठीमागील बाजूला असलेल्या मनपा शाळेच्या समोर परिसरातील नागरिकांकडून सर्रास कचरा टाकला जात आहे. त्या ठिकाणी विजेचा ट्रान्सफाॅर्मर असल्याने या कचऱ्यामुळे आग लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी स्कॅनिंग सेंटर आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना कचऱ्यामुळे नाक मुठीत धरूनच स्कॅनिंग सेंटरची पायरी चढावी लागत आहे. शून्य कचरा मोहिमेअंतर्गत कचरा उघड्यावर टाकणाऱ्या नागरिकांवर मनपाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
-----------------------------------------
फोटो आहे