गुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही!
By अजित मांडके | Published: December 11, 2023 07:33 PM2023-12-11T19:33:48+5:302023-12-11T19:34:06+5:30
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी, असं सांगण्यात आलं आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उथळसर प्रभागसमिती अंतर्गत सिद्धेश्वर जलकुंभाची इनलेट जलवाहिनीचा ५०० मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह बदलणे आवश्यक आहे. सदर जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्याचे काम गुरूवारी हाती घेण्यात येणार असल्याने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत एकूण १२ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
या शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिकेतर्फे सिद्धेश्वर जलकुंभ, इटरनिटी जलकुंभ, जॉन्सन जलकुंभ, समता नगर जलकुंभ, दोस्ती जलकुंभ, म्हाडा जलकुंभ, विवियाना मॉल आणि आकृती जलकुंभ अंतर्गत परिसर आदी भागांचा पाणीपुरवठा १२ तास पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच या पाणीकपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने व जपून करावा असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.