शुक्रवारी नाही ठाण्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:43 AM2021-05-20T04:43:41+5:302021-05-20T04:43:41+5:30

शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेमधून शहराला टप्प्याटप्प्याने पाणी देण्याचे नियोजन केले आहे. यानुसार शुक्रवारी सकाळी ९ ...

No water in Thane on Friday | शुक्रवारी नाही ठाण्यात पाणी

शुक्रवारी नाही ठाण्यात पाणी

Next

शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेमधून शहराला टप्प्याटप्प्याने पाणी देण्याचे नियोजन केले आहे. यानुसार शुक्रवारी सकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट, ब्रह्मांड, विजयनगरी, गायमुख, गांधीनगर, सुरकरपाडा, बाळकुम, माजिवाडा, मानपाडा, कोठारी कम्पाउंड, पवारनगर तसेच आझादनगर या भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवार संध्याकाळी ९ ते शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत कळवा, साकेत, ऋतुपार्क, सिद्धेश्वर, जेल टाकी, जॉन्सन, इंटरनिटी, समतानगर व मुंब्राचा काही भाग याठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Web Title: No water in Thane on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.