ध्वनिप्रदूषण, तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:45 AM2021-09-12T04:45:45+5:302021-09-12T04:45:45+5:30

मीरारोड : गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषण होऊ नये, समाजासमाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी ...

Noise pollution, police eye on crackers | ध्वनिप्रदूषण, तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची नजर

ध्वनिप्रदूषण, तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची नजर

Next

मीरारोड : गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिप्रदूषण होऊ नये, समाजासमाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालय सज्ज झाले आहे. नियम-आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहता गणेशोत्सव साध्या व घरगुती पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोरोना नियमांचे पालन करण्यासोबतच ध्वनिप्रदूषण व रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार, ध्वनिक्षेपक यंत्रणा पुरवठाधारक, महापालिका, अग्निशमन दल, वीजपुरवठा कंपन्या आदींच्या बैठका घेतल्या आहेत.

पोलिसांनी ५१० चौक बैठका घेऊन व्यापारी व नागरिकांशी संवाद साधून खबरदारीच्या सूचना दिल्या होत्या. मागील गणेशोत्सवादरम्यान गुन्हे दाखल असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केल्याचे सांगण्यात आले.

आवाजाची मर्यादा पाळणे बंधनकारक असल्याने ध्वनिक्षेपक कायद्याचे उल्लंघन करून ध्वनिप्रदूषण करणाऱ्या व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्यांवर कारवाईसाठी खास पथके नियुक्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.

गणेशमूर्तींच्या विसर्जनादरम्यान सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथक तसेच होमगार्ड पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तैनात आहे. समाजमाध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी सायबर सेलची पथके तैनात आहेत. गणेशोत्सवादरम्यान संशयास्पद किंवा अनुचित प्रकार घडल्यास नागरिकांनी तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यासह ०२२३५००६१३०; ०२२२९४५२१३५; ७०२१९९५३५२ व ७०२१९०९१०५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस आयुक्तालयाने केले.

...........

वाचली

Web Title: Noise pollution, police eye on crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.