ठाणे जिल्ह्यातील ११ विधानसभासाठी १५ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 08:54 PM2019-10-01T20:54:07+5:302019-10-01T20:59:29+5:30

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्हह्यातील ११ मतदार संघामध्ये १५ उमेदवारांनी त्यांचे १८ नामनिर्देशनपत्र मंगळवारी दाखल केले ...

Nomination papers of 15 candidates have been filed for 11 assembly constituencies in Thane district | ठाणे जिल्ह्यातील ११ विधानसभासाठी १५ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्हह्यातील ११ मतदार संघामध्ये १५ उमेदवारांनी त्यांचे १८ नामनिर्देशनपत्र मंगळवारी दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देऐरोली, ठाणे, मीरा भार्इंदर, डोंबिवली, कल्याण (प), भिवंडी (पूर्व) आणि शहापूर मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन अर्ज दाखल नाही१५ उमेदवारांचे १८ नामनिर्देशनपत्र मंगळवारी दाखल११ मतदार संघामध्ये १८ नामनिर्देशनपत्र

ठाणे : विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या तिसऱ्या दिवशी जिल्हह्यातील ११ मतदार संघामध्ये १५ उमेदवारांनी त्यांचे १८ नामनिर्देशनपत्र मंगळवारी दाखल केले आहेत. पण ऐरोली, ठाणे, मीरा भार्इंदर, डोंबिवली, कल्याण (प), भिवंडी (पूर्व) आणि शहापूर या विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नाही,असे ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
      जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रापैकी भिवंडी ग्रामीण या मतदार संघात विद्यमान आमदार शांताराम मोरे (शिवसेना), भिवंडी पूर्वमध्ये मनोज वामन गुळवी (अपक्ष) डॉ. नरु द्दीन निझाम अन्सारी (अपक्ष) , मुरबाडला प्रमोद हिंदुराव (राष्ट्रवादी), अंबरनाथला यतीन मोरे (अपक्ष), उल्हासनगरला ज्ञानेश्वर लोखंडे (अपक्ष ) यांनी अर्ज दाखल केला आहे. उल्हासनगरला आजअखेर पर्यंत तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
कल्याण पूर्वला बालाजी गायकवाड (अपक्ष), हरिचंद्र पाटील (संघर्ष सेना), कल्याण (ग्रा) ला सुभाष भोईर (शिवसेना), ओवळा-माजिवडा येथे प्रताप सरनाईक (शिवसेना ) यांनी चार अर्ज दाखल केले. तर कोपरी-पाचपाखाडीत साधना शिंदे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया), मुंब्रा-कळवा येथे महंमद युसूफ महंमद फारु ख खान (अपक्ष), फरहत महंमद अमीन शेख (इंडियन युनियन मुस्लिम लीग(अपक्ष) बेलापूरला अजय उपाध्याय (युवा जनकल्याण पक्ष ), संतोष कांबळे (अपक्ष ) या दोघांनी, असे १८ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत .

Web Title: Nomination papers of 15 candidates have been filed for 11 assembly constituencies in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.