आयुक्त, सत्ताधा-यांमध्ये असहकार आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:49 AM2018-01-20T01:49:29+5:302018-01-20T01:49:32+5:30

मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते सत्ताधाºयांना जुमानत नसल्याने महापौर डिंपल मेहता यांच्यापासून ते प्रभाग सभापतींपर्यंत सर्वांनी आपली दालने शुक्रवारपासून बंद करून निषेध व्यक्त केला.

The Non-Cooperation Movement in the Commissioner, the powerhouse | आयुक्त, सत्ताधा-यांमध्ये असहकार आंदोलन

आयुक्त, सत्ताधा-यांमध्ये असहकार आंदोलन

Next

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते सत्ताधाºयांना जुमानत नसल्याने महापौर डिंपल मेहता यांच्यापासून ते प्रभाग सभापतींपर्यंत सर्वांनी आपली दालने शुक्रवारपासून बंद करून निषेध व्यक्त केला.
पालिकेत भाजपाची सत्ता येताच आयुक्त व सत्ताधाºयांमध्ये कामातील अनियमिततेमुळे शीतयुद्ध सुरू झाले. जेसल पार्क नाल्याच्या कामात तर निविदा काढण्यापूर्वीच सत्ताधाºयांच्या मर्जीतील राहुल व्यास या कंत्राटदाराला कार्यादेश दिला. तीन कोटीच्या या कामाला मूळ कंत्राटदाराऐवजी उपकंत्राटदाराने कामाला सुरूवात केली. सत्ताधाºयांमधील एका नेत्याच्या भव्य गृहप्रकल्प बांधकाम परवानगीवर आयुक्तांऐवजी एका अधिकाºयाची स्वाक्षरी करण्यात आली.
काही महिन्यांपूर्वी सुमारे ९५ कोटींच्या नाला बांधकामाच्या निविदा वेगवेगळ्या न काढता या मोठ्या कामाची एकच निविदा काढली. यात बेकायदा असल्याची तक्रार आल्यानंतर राज्य सरकारने त्याला स्थगिती दिली. मात्र ती, स्थगितीच्याच दिवशी पुन्हा उठवली.
सत्ताधारी व प्रशासनातील काही बेकायदेशीरपणाचा पाढा थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे वाचला जाऊ लागला. कालांतराने आयुक्तांनी बेकायदेशीर कामांना असहकार करण्यास सुरूवात केली. दोन दिवसांपूर्वी सत्ताधाºयांनी पालिकेतील काही अधिकाºयांची बैठक बोलवली होती. त्यात यंदाच्या पालिका वर्धापनदिनाचा कार्यक्रम जल्लोषात करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. त्यासाठी प्रशासनाने केवळ ५ लाखांची तरतूद केल्याने ती सुमारे १ कोटीपर्यंत नेण्याची सूचना अधिकाºयांना करण्यात आली. परंतु, पालिकेकडे पुरेसा निधी नसल्याने वाढीव निधी कसा काय उभा करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे. अशातच आयुक्त महापौरांच्या बैठकीला हजर राहत नसल्याने आयुक्तांविरोधात सत्ताधाºयांमध्ये रोष निर्माण झाला.
आयुक्त सत्ताधाºयांना जुमानत नसल्याचा कांगावा करत त्याच्या निषेधार्थ महापौरांसह उपमहापौर चंद्रकांत वैती, स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, सभागृहनेते रोहिदास पाटील, प्रभाग समिती सभापती जयेश भोईर, डॉ. राजेंद्र जैन, गणेश शेट्टी, संजय थेराडे, अश्विन कासोदरिया, आनंद मांजरेकर यांनी आपापले दालने बंद केली आहेत. सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Web Title: The Non-Cooperation Movement in the Commissioner, the powerhouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.