पावसाची दडी : शहापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 03:58 AM2018-09-26T03:58:13+5:302018-09-26T03:58:33+5:30

किन्हवली तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारून उघडीप दिली असून कडक उन्हामुळे जोमाने वाढलेली भातपिके तडकली असून शेतकरी धास्तावला आहे.

NoRain : farmer of Shahapur taluka news | पावसाची दडी : शहापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

पावसाची दडी : शहापूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल

Next

किन्हवली - तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारून उघडीप दिली असून कडक उन्हामुळे जोमाने वाढलेली भातपिके तडकली असून शेतकरी धास्तावला आहे. या तडकलेल्या भातशेतीमुळे आता काय करायचे, असा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.
तालुक्यात १४ हजार हेक्टर जमिनीवर भातपिकाचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी तरी आपल्या पदरी विनासंकट भातपिके पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, शेतावर अनेक रोग पडले आणि १५ दिवस पावसाने उघडीप दिल्याने माळरानातील भातजमिनी तडकल्या. परिणामी, भातपिके कोमेजली.
येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर मात्र भातशेतीच्या उत्पन्नावर मोठी आफत येऊन त्याचे मोठे नुकसान होणार आहे. पावसाअभावी शेतीची अशीच स्थिती राहिली, तर यावेळी भातपिके जळून जाण्याची स्थिती आहे. या परिस्थितीत शेतीला पावसाची आवश्यकता असून आता भाताच्या आत दाणा तयार होत असताना पाण्याची नितांत गरज आहे. सोसायटीचे कर्ज काढून शेतकºयांनी शेती लावली असून विकत बियाणे आणि खते मारून तयार केलेल्या भातशेतीवर पावसाने दडी मारल्याने करप्या, बगळ्या हे रोग पडतात. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

पावसाअभावी
भात शेती तडकली
भातसानगर : शहापूर तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने जोमाने वाढलेली भात पीके उन्हाने तडकल्याने शेतकरी धास्तावला आहे.या तडकलेल्या भात शेतीमुळे आता काय करायचे असा प्रश्न त्याच्या समोर येवून ठेपला आहे. तालुक्यात १४ हजार हेक्टर जमिनीवर भात पिकांचे उत्पादन घेतले जाते. या वर्षी तरी आपल्या पदरी विना संकट भात पीके पडतील अशी आशा असताना गेले काही दिवसापासून शेतावर अनेक रोग पडलेले असतानांच आता गेले पंधरा दिवस पावसाने उघडीप दिल्याने माळरानातील भात जमीनी तडकल्याने भात पीके कोमेजुन जावू लागल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. जर आणखी काही दिवस पाऊस पडला नाही तर मात्र त्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
आता शेतकºयांचे लक्ष पावसाकडे असून पाऊस कधी पडतो अशी चिंता त्यांना लागली आहे. कारण सध्याच्या परिस्थिति शेतीला पावसाची आवश्यकता आहे.

सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकºयांनी भातशेतीची कामे वेळीच केली. चालू वर्षी पीक चांगले येईल, या आशेवर असतानाच पावसाने दडी मारल्याने हातातोंडाशी आलेला घास शेतकºयांच्या तोंडून निघून जाणार आहे.
- मल्हारी चंदे, शेतकरी / शेतकरी मार्गदर्शक
किन्हवली परिसरात पावसाचे प्रमाण कमी आहे व आता भातपीक पोटरीवर आहेत. पावसाने दडी मारल्यावर पिकांचे नुकसान होऊन भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
- दिलीप कापडणीस, कृषी अधिकारी, शहापूर

Web Title: NoRain : farmer of Shahapur taluka news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.