संविधानाच्या कमतरतेमुळे नव्हे;  उपेक्षेमुळे देशातील प्रश्न वाढले!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 06:10 AM2018-02-01T06:10:13+5:302018-02-01T06:10:22+5:30

आपल्या देशातील प्रश्न हे संविधानातील कमतरतेमुळे नाहीत, तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत, असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. संविधानाचे महत्त्व पटवून घ्यायचे असेल, तर संविधान नव्हते तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी, धर्मवादी, व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी कायदे होते, ते आधी समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.

 Not because of the Constitutional deficiency; Negative question raised in the country! | संविधानाच्या कमतरतेमुळे नव्हे;  उपेक्षेमुळे देशातील प्रश्न वाढले!  

संविधानाच्या कमतरतेमुळे नव्हे;  उपेक्षेमुळे देशातील प्रश्न वाढले!  

googlenewsNext

ठाणे : आपल्या देशातील प्रश्न हे संविधानातील कमतरतेमुळे नाहीत, तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत, असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. संविधानाचे महत्त्व पटवून घ्यायचे असेल, तर संविधान नव्हते तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी, धर्मवादी, व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी कायदे होते, ते आधी समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.
समता विचार प्रसारक संस्था व कोपरी संघर्ष समिती आयोजित सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेमध्ये बोलताना वारे म्हणाले की, संविधानाने भारतातील सर्व जातीधर्मांच्या स्त्रीपुरुषांना सन्मानाची आणि विकासाची हमी दिली आहे. आपले संविधान एक थेंबही रक्त न सांडता झालेली क्रांती आहे. कारण, आपल्या संविधानाने २१ वर्षांवरील सर्व स्त्रीपुरुषांना मतदानाचा अधिकार दिला आहे, ज्यासाठी इंग्लंड, अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी पुढारलेल्या देशातील स्त्रियांनासुद्धा किती वर्षे लढा द्यावा लागला होता. संविधान न वाचता त्याबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत. संविधान ही डोक्यावर घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही, तर ती डोक्यात घेऊन समजण्याची गोष्ट आहे. संविधानात फक्त राखीव जागा नाहीत, तर अजूनही बरेच काही आहे. शेतकºयांच्या मालाला भाव कसा मिळेल आणि त्यांच्या आत्महत्या कशा थांबतील, याचे उत्तरही संविधानाच्या योग्य अंमलबजावणीत आहे. संविधानाचे कायदे गरिबांच्या बाजूचे आहे, म्हणून गरीब खूश आहेत आणि त्याच कायद्यांची अंमलबजावणी होत नाही, म्हणून श्रीमंत खूश आहेत. आज संविधान बदलण्याची भाषा चालते आहे, कायद्याने संविधान बदलू शकता, पण त्यातील मूलभूत अधिकारांची मुख्य चौकट कुणीही बदलू शकत नाही. पण, असे असले तरीही फक्त संसद, फक्त कायदा, फक्त न्यायालय नागरिकांना मूलभूत अधिकाराची हमी देऊ शकत नाही. ती हमी फक्त नागरिकांची सामूहिक सद्सद्विवेक बुद्धीच देऊ शकते. म्हणून, संविधान अभ्यासून, समजून घेतले पाहिजे. संविधान फक्त घराबाहेरील समाजासाठी  नाही, तर घरासाठीही संविधान लागू आहे, असे मत त्यांनी मांडले.  अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ म्हणाले की, आज संविधानवादी समाज निर्माण करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कोपरी संघर्ष समितीचे विनोद मोरे होते. संस्थेचे सहखजिनदार सुनील दिवेकर यांनी प्रस्तावना, तर समितीचे राजेश गाडे यांनी आभार व्यक्त केले.

Web Title:  Not because of the Constitutional deficiency; Negative question raised in the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे