आयुक्त नोकरशहा नव्हे तर हुकमशहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:16 AM2018-03-28T00:16:59+5:302018-03-28T00:16:59+5:30

रेंटल घरांच्या मुद्यावरून आणि त्यानंतर महासभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आयुक्त आणि महापौरांमधील शीतयुद्ध

Not a bureaucrat, but a hooker! | आयुक्त नोकरशहा नव्हे तर हुकमशहा!

आयुक्त नोकरशहा नव्हे तर हुकमशहा!

Next

ठाणे : रेंटल घरांच्या मुद्यावरून आणि त्यानंतर महासभेला अधिकाऱ्यांनी दांडी मारल्यामुळे आयुक्त आणि महापौरांमधील शीतयुद्ध आणखीनच पेटले आहे. आपण ठाणेकरांचे नोकरदार आहोत, हे आयुक्त विसरले असून, ते हुकमशाही पद्धतीने काम करीत असल्याचा आरोप महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मंगळवारी केला. आयुक्तांनी माझा नाही तर समस्त ठाणेकरांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांनी ठाणेकरांची माफी मागावी, असे ठणकावत यापुढे जर अपमान केला तर मी माझ्या अधिकाराचा वापर करेन, असा इशाराही त्यांनी दिला.
मंगळवारी महासभा सुरू झाल्यानंतर लक्षवेधी आणि प्रश्नोत्तरांच्या तासामुळे लांबली. त्यामुळे ती सभा तहकुब करून बुधवारी पुन्हा बोलावली होती. मात्र, दुपारी दीड वाजले तरी पालिका सचिवांव्यतिरीक्त एकही अधिकारी तिला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे ती काही काळासाठी तहकूब केली. एकीकडे महासभा सुरू असतानाच दुसरीकडे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अर्बन रिर्सच सेंटर येथे सर्व अधिकाºयांची बैठक बोलावली. मार्चअखेरच्या कामांमध्ये अधिकारी व्यस्त असून, काही विधिमंडळ अधिवेशन आणि न्यायालयीन सुनावणीसाठी गेले आहेत, अशी सबब प्रशासनाने दिली. त्यामुळे आता महासभा केव्हा बोलवायची हे मी ठरविणार असल्याचे महापौरांनी प्रशासनाला सुनावले.
आता तर त्यापुढे जाऊन महापौरांनी आयुक्तांवर हुकूमशहा असल्याचा आरोप केला. जे सरकारी नोकर आहेत, ते स्वत:ला हुकूमशहा समजत आहेत, तुम्ही समोरासमोर चर्चा करायला घाबरता, दम असेल तर चर्चा करा, असे थेट आव्हानच त्यांनी आयुक्तांना दिले.
नगरसेवक विरोधात बोलले तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात, महासभेला अनुपस्थित राहून त्यांनी लोकशाहीचा अपमान केला आहे. महापौरांचे अधिकार अजून मी वापरलेले नाहीत. मात्र, वर्तणूक सुधारली नाही, तर ते मी वापरू शकते. सभागृहात हक्कभंगही येऊ शकतो, कसले ठाणे स्मार्ट करत आहात? स्वत:ला की शहराला? नागरिकांना उद्ध्वस्त करून शहर स्मार्ट कशी होणार? असे प्रश्न करून महापौरांनी आयुक्तावर तोफ डागली. ज्या वेळी गावदेवीचे गाळे उद्ध्वस्त केले गेले तेव्हाच ठाणेकरांनी आंदोलन करायला हवे होते, अशी चिथावणीखोर भूमिका महापौरांनी घेतली.

Web Title: Not a bureaucrat, but a hooker!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.