अंबरनाथ शहरात धुक्याची नव्हे, तर धुराची चादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:44 AM2021-08-28T04:44:36+5:302021-08-28T04:44:36+5:30
३ ते ४ दिवसांपासून अंबरनाथ शहरावर सकाळच्यावेळी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्यावेळी केमिकल ...
३ ते ४ दिवसांपासून अंबरनाथ शहरावर सकाळच्यावेळी धुक्याची दाट चादर पाहायला मिळत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्यावेळी केमिकल कंपन्या धूर सोडत असल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात धुकं कसे काय आले, हे पाहिले असता, या धुक्याला केमिकलचा दर्प येत असल्याचे समोर आले. त्यामुळे हे धुकं नसून, रासायनिक कंपन्यांमधून करण्यात आलेले केमिकल आणि गॅसचे उत्सर्जन असल्याचे स्पष्ट झाले. अंबरनाथ शहराला लागून मोरीवली एमआयडीसी, आनंदनगर एमआयडीसी आणि वडोळ एमआयडीसी असे ३ औद्योगिक विभाग असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत. यापैकी मोरीवली एमआयडीसीतून सर्वाधिक रासायनिक प्रदूषण होत असल्याचे आजवर घडलेल्या अनेक घटनांमधून समोर आले आहे. अंबरनाथ शहरात अनेकदा रासायनिक प्रदूषणाच्या घटना घडत असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनसुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहे.
----------