भिवंडीत सात जणांवर भारी पडले होते ‘नोटा’चे व्होट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 02:22 AM2019-04-24T02:22:55+5:302019-04-24T02:23:15+5:30
चार छोटे पक्ष, तीन अपक्षांना बसला फटका
भिवंडी : मागील काही वर्षांपासून निवडणुकीत ‘नोटा’चा वापरही मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल, तर मतदार ‘नोटा’चा वापर करतो. त्याचबरोबर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतो, हे यानिमित्ताने दिसून आले आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष अशा एकूण सात उमेदवारांना ‘नोटा’एवढी नऊ हजार ३११ मतेही मिळवता आलेली नाहीत. आपल्याला मोठ्या संख्येने मते मिळणार नाहीत, असे माहीत असतानाही काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावतात.
काही पक्ष व अपक्ष उमेदवार वारंवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. मात्र, मतदारराजा त्यांना त्यांची जागा दाखवतात. दरम्यान, मागील निवडणुकीत या सात उमेदवारांना मिळून २१ हजार ११४ मते मिळाली. तर, नऊ हजार ३११ मतदारांनी ‘नोटा’चा अधिकार बजावला होता. केवळ मतांच्या विभाजनासाठीच हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची चर्चा नेहमी होत असते. परंतु, ते मताधिक्यापासून कोसो दूर राहतात, असे दिसून आले आहे.
नोटा म्हणजे काय?
ठडळअ म्हणजे ठङ्मल्ली डा ळँी अुङ्म५ी (यापैकी कुणीही नाही). जर ईव्हीएम मशीनवर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल, तर नोटाला मत देऊ शकता. त्यासाठी सर्वात खाली एक बटण असते. ते दाबले तर वरीलपैकी कोणत्याच उमेदवाराला ते मत मिळत नाही.
7,12,690 मते मागील निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळाली होती. भाजपचे कपिल पाटील यांना ४,११,०७० तर काँग्रेसचे विश्वनाथ पाटील यांना ३,०१,६२० मते मिळाली होती.
गेल्या लोकसभा निवडणुकीत नोटापेक्षा कमी मते मिळालेले उमेदवार
उमेदवार पक्ष मते
सुरेश जाधव अपक्ष ५,९४१
हरिश्चंद्र पाटील अपक्ष ४०५८
योगेश कथोरे भारिप ३०५८
नावीद बेताब अपक्ष २४३५
अन्सारी जाहिद मुख्तार बमुप २१२६
शाह अबरार अह. नजीर पीस पार्टी २१२०
अनिता कोलेकर प्ररिपा १३७६
नोटा ९३११