रेल्वे प्रवासी डाटा तयार करण्यासाठी लक्षवेधी मोहीम

By Admin | Published: December 8, 2015 12:26 AM2015-12-08T00:26:44+5:302015-12-08T00:26:44+5:30

प्रवाशांची वाढती संख्या व अपुरया असलेल्या रेल्वे गाड्या यांचा समतोल साधला जात नसल्याने उपनगरीय रेल्वे प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक व जीवघेणा होत चालला आहे

Notable campaign to create rail passenger data | रेल्वे प्रवासी डाटा तयार करण्यासाठी लक्षवेधी मोहीम

रेल्वे प्रवासी डाटा तयार करण्यासाठी लक्षवेधी मोहीम

googlenewsNext

मुरलीधर भवार,  डोंबिवली
प्रवाशांची वाढती संख्या व अपुरया असलेल्या रेल्वे गाड्या यांचा समतोल साधला जात नसल्याने उपनगरीय रेल्वे प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक व जीवघेणा होत चालला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी रेल्वेने उपनगरीय प्रवासी डाटा तयार करण्यासाठी डोंबिवलीत जागरुक नागरीक राजन मुकादम यांनी दोन दिवस स्टेशन परिसरात मोहिम राबविली. पाच रुपये द्या आणि रेल्वे मंत्र्यांना सूचना करा असे या मोहिमेचे स्वरुप होते. मोहिम लहान स्वरुपातअसली तरी ती महत्वाची आहे. त्यातून आलेल्या सूचना रेल्वे मंत्र्यांसह कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रविंद्रन यांच्याकडे सादर केल्या जाणार आहे.
मुकामद यांनी डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पूर्व भागात रामनगर तिकीट खिडकीजवळ शुक्रवा व शनिवार या दोन दिवसात प्रवासी जन हो या आशयाचेआवहन करुन पाच रुपये द्या आणि रेल्वे मंत्र्यांना सूचना करा असे आवाहन केले होते. दोन दिवसात तब्बल ४८० प्रवासांनी पाच रुपये देऊन त्यांनी दिलेला फॉर्म भरला आहे. या फॉर्मवर प्रवासी पुरुष की महिला, प्रवासाचे ठिकाण, प्रवासी वेळ तास मिनिटांसह, नाव, पत्ता, गाडीच्या कोणत्या डब्यातून प्रवास करता, कामाचे ठिकाण कोणते या संदर्भात प्रश्न विचारुन ते भरुन घेतले आहेत. मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वेवर रेल्वे प्रशासन कधी शटल सेवा सुरु करतात. तर कधी ही सेवा प्रवाशांना न सांगताच बंद केली जाते. रेल्वेचा मनमानी कारभार हा प्रवाशांना सहन करावा लागतो.
रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे पॅसेंजरचा डाटा आहे. तो डाटा हा उपनगरीय मध् य व पश्चिम रेल्वेसाठी लागू करुन चालणार नाही. इंडियन पॅसेंजर डाटातून मध्य व पश्चिम रेल्वे प्रवासांचा डाटा वगळून नव्याने तो करण्यात यावा. यामागील प्रमुख उद्देश असा आहे याविषयी माहिती देताना मुकादम यांनी सांगितले की, रेल्वेने प्रवास करणारे पुरुष व महिला प्रवासी किती आहे.
सकाळी, दुपारी, संध्याकाळी व रात्रीच्या वेळी उपनगरीय गाड्यावर प्रवाशांचा किती लोड आहे. काही प्रवासी डोंबिवली दादर प्रवास करतात. ते महिन्याचा रेल्वे प्रवास पास हा डोंबिवली मुंबई असा काढता. कारण त्यांना गर्दीच्या वेळी गाडी मुंबई स्थानकात पकडणे सोयीचे वाटते. दादर स्थानकातून गाडी पकडत नाहीत. ठाणे डोंबिवली व डोंबिवली घाटकोपर या प्रवासाचे प्रवासी भाडे एकच आहे. त्यामुळे प्रवासी हा घाटकोपरपर्यंत प्रवास करणारा आहे अशी नोंद रेल्वेच्याकडे होते.
प्रवाशांनी सूचविलेल्या सूचनांची एक प्रत उद्या सोमवारी आयुक्तांकडे सादर केली जाणार आहे. तर मूळ प्रत ही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सादर केली जाणार आहे असे मुकादम यांनी सांगितले.

Web Title: Notable campaign to create rail passenger data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.