लॉकडाऊनमध्येही धोकादायक इमारतीना कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:05 PM2020-05-10T17:05:01+5:302020-05-10T17:05:09+5:30
सात दिवसात इमारत खाली करा; लॉकडाऊनमध्ये कुठे जाणार इमारतीत राहणाऱ्यांचा सवाल
कल्याण-पावसाळा महिन्याभरावर येऊन ठेपला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन व संचारबंदी सुरु आहे. घराबाहेर पडण्यास बंदी आहे. अशा परिस्थितीत कल्याण डोंबिवली महापालिकेने धोकादायक इमारतींना पावसाळ्य़ापूर्वी खाली करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. लॉकडाऊनमध्ये कुठे जाणार असा सवाल धोकदायक इमारतीत राहणा:या रहिवासीयांनी उपस्थित केला आहे.
डोंबिवली पूव्रेतील संगीतावाडी परिसरातील सरोज स्मृती या अतिधोकादायक इमारतीस महापालिकेने नोटिस बजावली आहे. सात दिवसात ही इमारत पाडण्यात यावी. अन्यथा ही इमारत खाली करावी. इमारतीत राहणा:यांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र करावी असे नोटिसमध्ये नमूद करण्यात आली आहे. या इमारतीत राहणा:या रहिवासियांनी लॉकडाऊनच्या काळात आम्ही कुठे जायचे? असा उपस्थित केला आहे. महापालिका हद्दीत जवळपास 4क्क् धोकादायक इमारती आहेत. या इमारती खाली करण्याच्या नोटिसा पावसाळ्य़ापूर्वी दिल्या जातात. 2015 साली ठाकूर्ली येथे धोकादायक इमारत पडून 9 जणांचा मृत्यू झाला होता. धोकादायक इमारतीत राहणा:यांकरीता घरकूल योजना राबविली जावी यासाठी डोंबिवलीतील दत्तनगर येथील राघवेंद्र सेवा संस्थेच्या वतीने याचिकाकर्ते सुनिल नायक यांनी याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे. महापालिकेने धोकादायक इमारतीत राहणा:या पुनर्वसनाकरीता योजना राबविला नाही. तसेच महापालिकेच्या बीएसयूपी घरकूल योजनेत घरे ही दिली गेली नाही. या योजनेतील घरे बांधून धूळ खात पडलेली आहे. महापालिका हद्दीत क्लस्टर योजना राबविण्याचा इरादा महापालिकेसह राज्य सरकारने व्यक्त केला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळयापूर्वी महापालिकेने नोटिसा देणो सुरु केल्यावर हा प्रश्न ऐरणीवर येतो. पावसाळा संपला की, हा प्रश्न थंडबस्त्यात पडून असतो. आत्ता प्रशासनापुढे कोरोनामुक्तीचा लढा अग्रक्रमावर आहे. धोकादायक इमारतीत राहणारे नागरीक कोरोनाच्या भितीमुळे धास्तावलेले असता त्यांच्या भितीत महापालिकेच्या नोटिसांनी भर घातली आहे.