मॅक्स लाइफ रुग्णालयाला नोटीस, ३६ लाखांचे वाढीव बिल आकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 01:55 AM2020-08-07T01:55:31+5:302020-08-07T01:55:46+5:30
उल्हासनगर पालिका : ३६ लाखांचे वाढीव बिल आकारले
उल्हासनगर : कोरोना रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणारी खाजगी रुग्णालये महापालिकेच्या रडारवर असून मॅक्स लाइफ रुग्णालयाला ३६ लाखांच्या वाढीव बिलप्रकरणी नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे.
शहरातील खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याची ओरड सर्वपक्षीय नेत्यांकडून केली जात आहे. त्यानंतर, आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांनी खाजगी रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी व उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णाच्या बिलाचे आॅडिट करण्यासाठी दक्षता समितीची स्थापना केली. दरम्यान, महापालिकेने एकूण १०८ बिलांचे आॅडिट करून संबंधित रुग्णालयाला नोटिसा बजावल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांनी दिली.
शहरातील मॅक्स लाइफ रुग्णालयातील एकूण ८२ कोरोना रुग्णांच्या बिलांचे आॅडिट या समितीने केले. यामध्ये ३६ लाखांचे जादा बिल लावल्याचे उघड झाले. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने नोटीसला उत्तर देणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.