महापौर आणि सभागृह नेत्यांना नोटीस
By admin | Published: October 19, 2015 02:31 AM2015-10-19T02:31:56+5:302015-10-19T02:31:56+5:30
कचोरे येथील कुष्ठरुग्णांना अडीच हजार रुपयांचे धनादेश वाटप केल्याच्या बातमीवरून केडीएमसीच्या निवडणूक आचारसंहिता विभागाकडून महापौर कल्याणी पाटील आणि सभागृह
कल्याण : कचोरे येथील कुष्ठरुग्णांना अडीच हजार रुपयांचे धनादेश वाटप केल्याच्या बातमीवरून केडीएमसीच्या निवडणूक आचारसंहिता विभागाकडून महापौर कल्याणी पाटील आणि सभागृह
नेते कैलास शिंदे यांना नोटिस बजावण्यात आल्या आहेत. तीन दिवसांत याप्रकरणी खुलासा करण्यास सांगण्यात आले
आहे.
जुलै महिन्यात कुष्ठरुग्णांना महापालिकेच्या वतीने धनादेशवाटप करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महापौर आणि सभागृह नेते उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते या धनादेशाचे वाटप करण्यात आले होते. याकाळात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. हे वृत्त एका इंग्रजी दैनिकात छापून आले आहे. त्यामुळे ही पेड न्यूज असल्याच्या संशयातून आचारसंहिता पथकाने दोघांनाही नोटिस बजावली आहेत. याप्रकरणी संबंधित वृत्तपत्राचा प्रतिनिधी आणि महापालिकेचे सहायक जनसंपर्क अधिकारी प्रसाद ठाकूर यांनाही नोटिसा बजावणार असल्याची माहिती आचारसंहिता पथकाचे प्रमुख जमीर लेंगरेकर यांनी दिली. कुष्ठरुग्णांचे मानधन वाढवून अडीच हजार करण्यात आले. याबाबतचे प्रयत्न महापौर पाटील आणि सभागृह नेते शिंदे यांनी केल्याचे संबंधित दैनिकातील वृत्तात म्हटले आहे. त्यामुळे ही पेड न्यूज आहे का, याबाबतची चौकशी आचारसंहिता पथकाकडून सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भात पाटील आणि शिंदे यांच्याशी संपर्क होऊ शकला
नाही. (प्रतिनिधी)