ठाणे स्थानकात रिंग हायड्रंट्स बसविण्याच्या महापालिकेच्या रेल्वे विभागाला सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 03:29 PM2018-01-18T15:29:39+5:302018-01-18T15:32:15+5:30
प्लेटफॉर्म रेल्वे डब्याला आग लागल्यास ती तत्काळ विझविण्यासाठी ठाणे महापालिकेने रेल्वेला मागील जून महिन्यातच या ठिकाणी रिंग हायड्रंट्स (गोलाकार नळ) बसविण्याच्या सुचना केल्या आहेत. परंतु ही बाब अद्यापही रेल्वेने मनावर घेतली नसल्याचेच मंगळवारच्या घटनेवरुन दिसून आले आहे.
ठाणे - ठाणे रेल्वे स्थानकात कारशेडला उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्याने मंगळवारी मध्यरात्री अचानक पेट घेतला आणि तो डबा जळून खाक झाला. मात्र अशा घटना घडू नयेत, किंवा घडल्यास, अग्निशमन पथक येईपर्यंत आग विझवण्यासाठी साधन उपलब्ध व्हावीत, यासाठी ठाणे महापालिकेने मध्य रेल्वेला रिंग हायड्रंट्स (गोलाकार नळ) बसवण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. ठाणे स्थानकात अशा प्रकारे घडलेली ही दुसरी घटना आहे. त्यामुळे अग्निशमन दल घटनास्थळी येईपर्यंत या नळांचा वापर करून आग विझवता येऊ शकेल असा दावा महापालिकेने केला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र मांक १ जवळ सायिडंगला उभ्या असलेल्या लोकलच्या एका डब्याने मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास आग लागली होती. हा प्लॅटफॉर्म रस्त्याच्या अगदी जवळ आहे. बी-केबिन या बाजूने सुद्धा या प्लॅटफॉर्मवर जाता येते. मात्र ऐन गर्दीच्या वेळी असा प्रकार घडल्यास आणि स्थानकातील अन्य प्लॅटफॉर्म वर अशी घटना घडल्यास मोठी आपत्ती उदभवू शकते. त्यामुळे गेल्या जुने मध्ये स्थानकात ज्यावेळी अशी घटना घडली होती, त्याचवेळी आम्ही त्यांना अशा प्रकारे व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र रेल्वेने त्याकडे दुर्लक्ष केल्याची माहिती महापालिकेतील एका वरीष्ठ अधिकाºयाने दिली. अग्निशमन विभाग रेल्वे विभागाला पुन्हा या संदर्भात नव्याने सूचना पत्र देणार असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले. स्थानकातील हे नळ, शासनाच्या नियमानुसारच असणार आहेत आणि अनेक स्थानकांमध्ये असे नळ आढळतात. अन्य वेळी, पाणी भरण्यासाठी, किंवा लांब पल्ल्याच्या गाडयांना धुण्यासाठी याचा वापर केला जातो. अशी माहिती सुद्धा महापालिकेतील अधिकाºयांनी दिली.
प्रत्येक प्लॅटफॉर्म वर ३० मीटरच्या अंतरावर अशा प्रकारे हायड्रंट्स असायला हवेत. १०० मीटर लांबीचे आग विझवण्याचे पाईप्स असायला हवे, जेणेकरून, रेल्वे विभागाला अशा आपत्तीच्या वेळी या पाण्याचा वापर तत्काळ करता येईल. स्टेशनपर्यंत अग्निशमन दलाचे पाईप्स पोहोचणे तसे कठीण जाऊ शकतात. यामुळे अशी व्यवस्था रेल्वेने केल्यास अनर्थ टाळू शकेल असा दावाही पालिकेच्या एका वरीष्ठ अधिकाºयाने केला आहे.
दरम्यान यापूर्वी ७ जुन २०१७ रोजी ठाण्यातील बी केबिन जवळील प्लॅटफॉर्म वरील उभ्या असलेल्या रेल्वे डब्याने पेट घेतला होता. रेल्वे विभागाला धूर घालवण्यासाठी शेवटी अग्निशमन दलाला बोलवावे लागले होते. तर नोव्हेंबर २०१६ मध्ये कल्याण लोकल मधील एका डब्ब्यात पेट घेतला होते. वरील पेंटाग्राफ तुटल्यामुळे, या डब्याने पेट घेतला होता. तब्बल ५० प्रवाशांना येथून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. डब्याला लागलेल्या आगीच दृश्य बघून स्थानकात सुद्धा अनेकांनी पळापळ करायला सुरु वात केली.