Thane: हजर हाेण्यासाठी संपावरील अंगणवाडी सेविकांच्या घरावर प्रशासनाची नाेटीस

By सुरेश लोखंडे | Published: January 6, 2024 06:49 PM2024-01-06T18:49:23+5:302024-01-06T18:53:18+5:30

Thane News: जिल्हा पातळीवरील प्रकल्प कार्यालयाने या सेविकांना ४८ तासात हजर हाेण्याची नाेटीस त्यांच्या घराला लावून दडपण आणण्याचा प्रयत्न आता सुरू केला आहे. त्यामुळे एकच खळबळ सुरू झाली.

Notice of administration at the house of Anganwadi workers on strike to appear | Thane: हजर हाेण्यासाठी संपावरील अंगणवाडी सेविकांच्या घरावर प्रशासनाची नाेटीस

Thane: हजर हाेण्यासाठी संपावरील अंगणवाडी सेविकांच्या घरावर प्रशासनाची नाेटीस

- सुरेश लोखंडे 
ठाणे  - ठाणे जिल्ह्याच्या शहरातील व ग्रामीणमधील अंगणवाडी सेविका गेल्या एक महिन्यांपासून सहभागी आहेत. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रालयीन प्रशासनाच्या बैठकीत मागण्यांवर ताेडगा निघाला नाही. त्यानंतर आता जिल्हा पातळीवरील प्रकल्प कार्यालयाने या सेविकांना ४८ तासात हजर हाेण्याची नाेटीस त्यांच्या घराला लावून दडपण आणण्याचा प्रयत्न आता सुरू केला आहे. त्यामुळे एकच खळबळ सुरू झाली.

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांना कामावर हजर होण्याची नाेटीस काढली आहे. ४८ तासात हजर हाेण्याची ही नाेटीस घेण्यास नकार दिलेल्या सेविकांच्या घराला ही नाेटीस चिटकवली जात असल्याचे आढळून आले आहे. मात्र या नाेटीसला न जुमानता सेविकां व मदतीस यांच्याकडून संप सुरूच ठेवण्यात आलेला आहे. त्यास अनुसरून जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या प्रकल्प कार्यालयांनी

सेविका शासन निर्णयानुसार १३ ऑगस्ट २०१४ नुसार अंगणवाडी मदतनीस म्हणून आपली नेमणूक असून आपण मदतनीस पदाचे कर्तव्य पार पाडण्यात कसून करत असल्याचे कार्यालयाच्या निदर्शनास येत आहे. तरी त्वरीत आपण अंगणवाडी केंद्रात हजर होऊन तसा अहवाल पर्यवेक्षिकांना सादर करावा. अन्यथा आपणांस सेवेतून कमी केले जाईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी. दोन दिवसात अंगणवाडी केंद्रात हजर होवून त्याबाबतचा लेखी अहवाल पर्यवेक्षिकांना सादर करावा, असे संबंधीत नाेटीसमध्ये नुद करण्यात आल्याचे आढळून आले आहे.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंह, कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील अंगणवाडीसेविका व मदतनीस यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या सेविका, मदतनीस यांना शासकीय दर्जा देण्यात यावा. त्यांच्या कामास अनुसरून वेतनात वाढ करावी आदी प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी हा बेमुदत संप सुरू आहे.

Web Title: Notice of administration at the house of Anganwadi workers on strike to appear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे