मराठी भाषेत नामफलक न लिहणाऱ्या धार्मिकस्थळांना नोटिसा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 08:31 PM2021-03-17T20:31:38+5:302021-03-17T20:32:30+5:30

Marathi : नामफलक मराठी भाषेत न लिहणाऱ्या  मीरारोड मधील ४ धार्मिक स्थळांना सार्वजनिक  न्यास नोंदणी कार्यालयाचे अधीक्षक यांनी नोटीस बजावल्या आहेत .

Notice to religious places which do not write nameplates in Marathi language | मराठी भाषेत नामफलक न लिहणाऱ्या धार्मिकस्थळांना नोटिसा 

मराठी भाषेत नामफलक न लिहणाऱ्या धार्मिकस्थळांना नोटिसा 

googlenewsNext

मीरारोड - नामफलक मराठी भाषेत न लिहणाऱ्या  मीरारोड मधील ४ धार्मिक स्थळांना सार्वजनिक  न्यास नोंदणी कार्यालयाचे अधीक्षक यांनी नोटीस बजावल्या आहेत . नोटीस मिळाल्या नंतर नामफलक मराठी भाषेत ठळक अक्षरात लावण्यात यावेत असे धार्मिक स्थळांना सांगण्यात आले आहे . (Notice to religious places which do not write nameplates in Marathi language)

कायद्याने मराठी भाषेत ठळक अक्षरात नामफलक लिहणे बंधनकारक असताना सुद्धा अनेक आस्थापना , धार्मिक स्थळे , हॉटेल , बार , लॉज आदी मराठी भाषेचा अनादर करून अन्य भाषेत फलक लावतात . मराठी एकीकरणी समितीने सुद्धा मराठीत  नामफलक असावेत या साठी धर्मादाय आयुक्तां कडे तक्रार केली होती . 

त्या अनुषंगाने मीरारोडच्या शांती नगर सेक्टर ४ मधील एक व सेक्टर ६ मधील दोन धार्मिक स्थळे तर साईबाबा नगर मधील एका धार्मिक स्थळांच्या मराठीत नामफलक नसल्या बाबतची तक्रार निनाद सावंत ह्या मराठी भाषा प्रेमी नागरिकाने केली होती . 

ठाणे अधीक्षक यांनी तक्रारींच्या अनुषंगाने मीरारोड मधील सदर चार हि धार्मिक स्थळांना नोटीस बजावल्या आहेत .  नोटीस मिळाल्या नंतर धार्मिक स्थळांवरील नामफलक मराठी भाषेत ठळक अक्षरात लावण्यात यावेत. तसेच मराठी भाषेत नामफलक लावले असल्याचे लेखी स्वरूपात कळवावे असे निर्देशच धार्मिक स्थळांना देण्यात आले आहेत .    
 

Web Title: Notice to religious places which do not write nameplates in Marathi language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.