इशरतच्या आईला संरक्षण शुल्काची नोटीस

By admin | Published: January 11, 2017 05:00 AM2017-01-11T05:00:43+5:302017-01-11T05:00:43+5:30

पोलीस संरक्षण पाहिजे असल्यास दररोज एक हजार सातशे २३ रुपये शुल्क भरण्याची नोटीस गुजरात पोलिसांच्या चकमकीत साडेबारा वर्षांपूर्वी ठार झालेल्या इशरत जहाँच्या

Notice of security charge to Ishrat's mother | इशरतच्या आईला संरक्षण शुल्काची नोटीस

इशरतच्या आईला संरक्षण शुल्काची नोटीस

Next

मुंब्रा : पोलीस संरक्षण पाहिजे असल्यास दररोज एक हजार सातशे २३ रुपये शुल्क भरण्याची नोटीस गुजरात पोलिसांच्या चकमकीत साडेबारा वर्षांपूर्वी ठार झालेल्या इशरत जहाँच्या आईला ठाणे पोलिसांनी धाडली आहे.
विद्यमान पंतप्रधान आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची कथित हत्या करण्यासाठी गुजरातमध्ये मित्राबरोबर गेलेल्या मुंब्य्रातील इशरत या तरुणीसह अन्य तिघांना १५ जून २००४ रोजी गुजरात पोलिसांनी अहमदाबाद येथे चकमकीत ठार केले. त्यानंतर चकमक खरी होती की खोटी याचा न्यायनिवाडा व्हावा, यासाठी काही समाजसेवकांनी गुजरातमधील उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. त्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी गुजरात, दिल्लीत गेल्यावर तसेच मुंब्य्रातही काही जण पाठलाग करीत असल्याचा दावा इशरतच्या आईने तसेच तिच्या सहकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे तिला २४ तास नि:शुल्क सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात आले होते. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा ठाणे पोलिसांच्या संरक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आल्यानंतर इशरतच्या आईला यापुढे सशुक्ल संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)

पोलीस संरक्षणासाठी शुल्क भरण्याची नोटीस मिळाली आहे.  परंतु पैसे भरण्याएवढी माझी आर्थिक स्थिती नाही. वकिलामार्फत तसे पोलिसांना कळवले आहे.
- शिममा कौसर शेख, इशतची आई

Web Title: Notice of security charge to Ishrat's mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.