आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना सुविधा नाकारणाऱ्या शाळेला नोटीस
By धीरज परब | Published: July 22, 2023 07:00 PM2023-07-22T19:00:16+5:302023-07-22T19:00:29+5:30
मातेकर यांनी शाळा व्यवस्थापन ला आरटिई नियम नुसार विद्यार्थ्यांना मोफत साहित्य व सुविधा देण्यास सांगितले होते.
मीरारोड - आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक सुविधा न देणाऱ्या मीरारोडच्या यु. एस. ओस्तवाल शाळेला शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर यांनी नोटीस बजावत कार्यवाहीचा इशारा दिला आहे. 'आरटीई' अंतर्गत ओस्तवाल शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना नियमानुसार मोफत शैक्षणिक साहित्य - सुविधा शाळा व्यवस्थापन देत नसल्याच्या विरोधात अनेक तक्रारी करून सुद्धा दाद मिळत नसल्याने पालकांनी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.
मातेकर यांनी शाळा व्यवस्थापन ला आरटिई नियम नुसार विद्यार्थ्यांना मोफत साहित्य व सुविधा देण्यास सांगितले होते. परंतु शाळेने शिक्षणाधिकारी यांच्या पत्रा नुसार कार्यवाही केली नाही. जेणेकरून मातेकर यांनी शाळेला नोटीस बजावत खुलासा सादर करावा तसेच खुलासा समाधान कारक नसेल तर शाळे विरुद्ध प्रशासकीय कार्यवाही केली जाईल असा इशारा शिक्षणाधिकारी मातेकर यांनी शाळा व्यवस्थापन ला दिला आहे.