मृत्यूची नोंंद न केल्याने रुग्णालयांना बजावल्या नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:44+5:302021-06-16T04:52:44+5:30
......... आम्हाला आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंद करायची आहे, ही बाब उशिरा समजली. आम्ही पालिकेला मात्र सर्व मृत्यूंची माहिती दिली. अनेक ...
.........
आम्हाला आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंद करायची आहे, ही बाब उशिरा समजली. आम्ही पालिकेला मात्र सर्व मृत्यूंची माहिती दिली. अनेक रुग्ण हे आरटीपीसीआर टेस्ट न करता फक्त एचआरसिटी करून येतात. काही रुग्ण फक्त अँटिजन करून येतात, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने ही प्रक्रिया करण्याऐवजी त्यांच्यावर आधी उपचार करावे लागतात. मात्र त्यांच्याकडे पॉझिटिव्ह असल्याची आयसीएमआरची नोंदणी आणि नंबर नसल्याने त्यांच्या मृत्यूची नोंद करताना अडचणी येतात.
- डॉ. मनोज सिंग, साई सिटी हॉस्पिटल, अंबरनाथ
........
खासगी कोविड रुग्णालयांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद पोर्टलवर का केली नाही, याबाबत आम्ही संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. शहरात जेवढे रुग्ण मृत झाले आहेत, त्या सर्वांची नोंद पालिका करणार आहे. आकडेवारी लपविण्यात पालिकेला कोणताही रस नाही.
-डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी
----------------------------------------------