रेल्वेला आता हवा ८९ मीटर लांबीच्या पुलाचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 04:51 AM2018-08-28T04:51:19+5:302018-08-28T04:51:40+5:30

पत्रीपुलाची फेरबांधणी : पाच मीटरने वाढ, एमएसआरडीसीपुढील अडचणी वाढल्या, गणेशोत्सवानंतर पाडकाम

Now, the 9 8 meter long bridge has been designed by the Railways | रेल्वेला आता हवा ८९ मीटर लांबीच्या पुलाचा आराखडा

रेल्वेला आता हवा ८९ मीटर लांबीच्या पुलाचा आराखडा

Next

कल्याण : शहरातील जुना पत्रीपूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासन आणि एमएसआरडीसी यांचे सूत जुळता जुळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. रेल्वे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे ८४ मीटर लांबीचा पूल उभारण्यासाठी आराखडा बनविण्याचे नियोजन एमएसआरडीसी करीत होते, पण आता पुन्हा रेल्वेने पुलाची लांबी पाच मीटरने वाढवत तो ८९ मीटरचा हवा, असा नवा फतवा काढला आहे. त्यामुळे एमएसआरडीसीची डोकेदुखी वाढली आहे.

एमएसआरडीसीचे अभियंता अनिरुद्ध बोरडे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘पुलाची लांबी आणखी पाच मीटरने वाढविण्यासंदर्भात नुकतेच रेल्वेने कळवले. त्यानुसार आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे, पण त्यास काही अवधी लागण्याची शक्यता आहे. आठवडाभरात आराखडा बनवून सर्व वरिष्ठांच्या संमतीनंतर तो रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात येण्यात येईल. त्यानंतर त्यांच्याकडून मंजुरीसाठी नेमका किती अवधी लागेल हे आता काहीच सांगता येणार नाही.’ रेल्वेने आधी पुलाच्या लांबीसाठी ६०, ७२, ८४ आणि आता ८९ मीटरची अट घातली आहे. प्रत्येक वेळेस रेल्वे पुलाची लांबी वाढवत असल्याने आराखडा बनविण्यापासून सर्वच बाबींमध्ये विलंब होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे, जुन्या पत्रीपुलावर गणेशोत्सवानंतरच हातोडा पडणार असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हा पूल २५ आॅगस्टला पाडायचा होता. त्यासाठी पूर्ण नियोजनही झाले होते, पण आता हे नियोजन पुढे ढकलले आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच त्यावर हातोडा पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा पूल वाहतुकीसाठी मात्र बंदच राहील, असा पवित्राही रेल्वे प्रशासनाने घेतल्याने कल्याणमध्ये वाहतूककोंडी कायम आहे.

पूल अद्यापही बंदच
शिवसेनेने शनिवारी आंदोलन करून जुना पत्रीपूल वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी केली होती. त्या वेळी रेल्वेने पत्रीपूल पादचाºयांसाठी शनिवार, २५ आॅगस्टपर्यंत खुला करण्यात येईल, असे सांगितले होते. मात्र, सोमवारपर्यंत तो खुला झालेला नव्हता. त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.

वाहतूक पोलीस उपायुक्तांनी केली पाहणी
च्जुना पत्रीपूल बंद केल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सोमवारी दुपारी पत्रीपुलाची पाहणी करून शहरातील एकूणच वाहतूककोंडीचा आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासमवेत वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गोसावी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख आणि कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र शिरसाठ उपस्थित होते.

च्जुना पत्रीपूल पाडण्याचा निर्णय रेल्वेने २५ सप्टेंबरपर्यंत स्थगित ठेवला आहे. त्या अनुषंगाने अमित काळे यांनी या पुलाची पाहणी करून वाहतूककोंडीचा आढावा घेतला. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी स्थानिक वाहतूक अधिकाºयांना सूचना केल्या. १० सप्टेंबरपर्यंत मुंब्रा बायपास सुरू होणार आहे.

च्त्यानंतर वाहतूककोंडीची समस्या भेडसावणार नसल्याचे काळे
यांनी या वेळी सांगितले. कल्याण शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी स्थानिक पोलीस, वाहतूक पोलीस आणि वार्डन यांच्या मदतीने प्रयत्न सुरू आहेत. विरुद्ध दिशेने येणाºया वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडते.

च् त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाºया वाहनचालकांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. अवजड वाहनांमुळेदेखील वाहतूककोंडी होत असल्याने या दिशेने अवजड वाहने न सोडण्याच्या सूचना नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण पोलिसांना केल्याचे काळे यांनी या वेळी सांगितले.

Web Title: Now, the 9 8 meter long bridge has been designed by the Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.