नवीन ठाण्यानंतर आता वेध नवीन भिवंडीचे!

By admin | Published: January 16, 2016 12:32 AM2016-01-16T00:32:40+5:302016-01-16T00:32:40+5:30

अप्पर ठाणे, त्यानंतर नवीन ठाणे या संकल्पनांतून गृहसंकुलांची नवी पिढी उभी राहिल्यानंतर आता नवीन भिवंडी विकसित करण्याच्या बांधकाम व्यावसायिकांच्या हालचाली

Now after the new Thane, the new Vivandi! | नवीन ठाण्यानंतर आता वेध नवीन भिवंडीचे!

नवीन ठाण्यानंतर आता वेध नवीन भिवंडीचे!

Next

ठाणे : अप्पर ठाणे, त्यानंतर नवीन ठाणे या संकल्पनांतून गृहसंकुलांची नवी पिढी उभी राहिल्यानंतर आता नवीन भिवंडी विकसित करण्याच्या बांधकाम व्यावसायिकांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एमसीएचआयच्या प्रदर्शनात यंदा प्रथमच नवीन भिवंडीतील नवनवीन प्रकल्प पाहण्याची संधी उपलब्ध आहे आणि तीही सर्वसामान्यांना परवडतील, अशा दरात.
दुसरीकडे मूळ ठाण्यात मंदीचे सावट असतानाही गृहसंकुलांचे दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच असून घोडबंदरच्या शेवटच्या टोकाला मात्र त्यातल्या त्यात सर्वसामान्यांना परवडणारी घरे या प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. एमसीएचआयच्या १५ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. या प्रदर्शनात काही वर्षांपूर्वी अप्पर ठाणे अर्थात घोडबंदरच्या घरांचे प्रकल्प पाहायला मिळात होते. परंतु, आता घोडबंदरचा पट्टाही जवळजवळ पूर्ण होत आल्याने नवीन ठाणे म्हणून विकसित होत असलेल्या खारबाव आणि आजूबाजूच्या परिसरातील प्रकल्प मागील दोन वर्षांत या प्रदर्शनाचा भाग बनले होते. ही दोन्ही ठिकाणे जवळपास विकसित होत असल्याने किंबहुना येथील जागा कमी होऊ लागल्याने विकासकांनी आता नवीन भिवंडीची संकल्पना पुढे आणली आहे. त्यानुसार, मुंबई-नाशिक महामार्गालगत विकसित होणाऱ्या या नवीन भिवंडीत सुरू होणाऱ्या किंबहुना सुरू झालेल्या प्रकल्पांचे विविध स्टॉल यंदाच्या प्रदर्शनात सर्वसामान्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत. तेथील वाहतुकीच्या प्रश्नावरील तोडगेही दिले जात आहेत, हे त्याचे आणखी एक वैशिष््टय.
अधिक वृत्त पान /७

२७००पासून ते ४१०० पर्यंत आणि विविध सोयीसुविधायुक्त अशा वन बीएचके आणि टू बीएचके फलॅटसाठी येथे पसंती दर्शविली जात आहे. परंतु, नवीन भिवंडी आहे कुठे, असा प्रश्न येथे येणाऱ्या सर्वसामान्यांना पडला असून त्या प्रश्नाचे उत्तरही या प्रदर्शनातून सोडविण्यात आले आहे. नवीन भिवंडी अर्थात कल्याण फाट्यावरून भिवंडीकडे जाणाऱ्या हाय वेलगत असलेल्या भादवड येथे गृहसंकुलांचे नवे प्रकल्प सुरू होत आहेत.

आता पर्याय घोडबंदरच्या डोंगरपायथ्याचा
मूळ ठाण्यात नवीन प्रकल्पांची संख्या कमी असताना मंदीचे सावट उठलेले असल्याचा दावा आयोजकांकडून केला जात असला तरी सर्वसामान्यांना येथे घर घेणे जिकिरीचे झाले आहे.
वन बीएचके जरी या भागात घेण्याचा विचार झाला तरी त्याची सुरुवात ६५ लाखांपासून पुढेच असून घोडबंदरच्या सुरुवातीच्या पट्ट्यातदेखील असेच काहीसे दर आहेत.
शेवटच्या टोकाला म्हणजेच डोंगराच्या पायथ्याशी मोघरपाडासारख्या भागात सर्वसामान्यांना स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन, विविध सुविधायुक्त फलॅट ३५ ते ४५ लाखांच्या घरात उपलब्ध आहे.

Web Title: Now after the new Thane, the new Vivandi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.