आता बिनधास्त परदेशात वाहन चालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:43 AM2021-08-27T04:43:16+5:302021-08-27T04:43:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : आता आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यांचे नूतनीकरणदेखील करता येणार आहे. त्या त्या देशातील भारतीय दुतावासात हे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : आता आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यांचे नूतनीकरणदेखील करता येणार आहे. त्या त्या देशातील भारतीय दुतावासात हे नूतनीकरण करता येईल. परंतु, त्यासाठी पासपोर्ट, व्हिसा यासह तांत्रिक बाबींची पूर्तता करणे गरजेचे आहे.
आतापर्यंत हजारो भारतीय नागरिकांना ती सेवा मिळाली असून, जे नियमांची पूर्तता करतात त्या सगळ्यांना अटी-शर्थी पाहून सुविधा संबंधित प्राधिकरण देत असल्याची माहिती कल्याण आरटीओ कार्यालयातून देण्यात आली.
-------------
कल्याण आरटीओने दिलेले परवाने
वर्ष आंतरराष्ट्रीय वाहन परवाने
२०१८ ३५५
२०१९। ४१०
२०२०। २६५
२०२१ (ऑगस्टपर्यंत) २००
--------------
असा काढा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना
पासपोर्ट, व्हिसा यासह कोणते वाहन, कुठे चालवणार याबाबतची माहिती परिवहन विभाग तसेच जे आवश्यक विभाग आहेत त्या ठिकाणी देणे. त्यानंतर मार्गदर्शनानुसार अर्ज भरून इतर बाबींची पूर्तता करणे.
--------------
कोण काढतो हा परवाना
सामान्यपणे जे परदेशी शिकायला जाणारे, नोकरीसाठी तसेच वास्तव्याला असल्यावर अशा वाहनपरवान्याची गरज भासते. ते देताना संबंधित यंत्रणांसमवेत खातरजमा केल्याशिवाय ते देताही येत नसल्याचे सांगण्यात आले.
-----------
ज्या व्यक्ती येथून परदेशी शिकायला, नोकरीला जातात, त्यांना आवश्यकता असेल, तर ते नागरिक या सुविधेसाठी अर्ज करतात. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून संबंधित प्राधिकरणांच्या माध्यमातून नियमांची पूर्तता करून मगच ही सुविधा दिली जाते. - तानाजी चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण.
---------