...आता सक्ती एमएससीआयटीची!

By Admin | Published: January 12, 2017 07:12 AM2017-01-12T07:12:14+5:302017-01-12T07:12:14+5:30

केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नतीसाठी लेखी परीक्षा सक्तीची केली असतानाच आता

... now forced MSCIT! | ...आता सक्ती एमएससीआयटीची!

...आता सक्ती एमएससीआयटीची!

googlenewsNext

कल्याण : केडीएमसीच्या सामान्य प्रशासन विभागाने पदोन्नतीसाठी लेखी परीक्षा सक्तीची केली असतानाच आता अन्य एका परिपत्रकात एमएससीआयटीची परीक्षा बंधनकारक केली आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास वेतनवाढ रोखण्यात येईल, असा फतवा प्रशासनाने काढल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. याप्रकरणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी पत्रव्यवहार करून हा निर्णय अन्यायकारक आहे, असे म्हटले आहे.
केडीएमसीतील कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा नियम २०१३ पासून लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, तत्पूर्वी सरकारने महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संगणक हाताळणी तसेच एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे, असे आदेश वेळोवेळी दिले. असे असताना याची माहिती महासभेच्या निदर्शनास आणून देणे आवश्यक होते. परंतु, आता एमएससीआयटीची सक्ती करून वेतनवाढ रोखण्याचा दिलेला इशारा अन्यायकारक आहे, याकडे कर्मचारी संघटनेने आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
एमएससीआयटी उत्तीर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांची १ जानेवारी २००८ पासूनची वेतनवाढ रोखून ठेवू, असा इशारा सामान्य प्रशासन विभागाने दिला आहे. यावर, कर्मचारी संघटनेने ज्या वेळी २०१३ मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करताना महासभेची मान्यता घेतली, त्या वेळी एमएससीआयटीची मान्यता घेणे आवश्यक होते. (प्रतिनिधी)

Web Title: ... now forced MSCIT!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.