लोकसभा निवडणुकीचा बदला घेण्याची हीच वेळ - नाना पटोले
By अजित मांडके | Published: June 20, 2024 10:00 PM2024-06-20T22:00:12+5:302024-06-20T22:00:36+5:30
कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ ठाण्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : लोकसभा निवडणूक महायुतीने षडयंत्रणे जिंकली आहे. मात्र आता ही निवडणूक बॅलेट पेपरवर होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. या निवडणुकीला एकजुटीने आणि झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या बदला घेण्यासाठी ही निवडणूक लढायची असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
कोकण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्या प्रचारार्थ ठाण्यात एक सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे यांचे कोकणामध्ये काहीच नाही असे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणूक इविहीएम जिंकली. मात्र बॅलेटनेच मतदान झालं पाहिजे हे या देशातील जनतेचे मत आहे, मात्र इविहीएम मुले आपल मत ज्याला देतोय त्याला जात की नाही हा व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला असल्याचे ते म्हणाले. त्यामुळं या निवडणुकीत धनशक्ती मोठी की जनशक्ती मोठी हे कळेल असेही ते म्हणाले. लोकसभेत धनशक्ती जिंकली मात्र आता जनशक्ती जिंकून दाखवून द्या असे आवाहन ही त्यांनी केले.
दबावाचे राजकारण ठाणे जिल्ह्यात केले जाते. मात्र घाबरणारे व्यवस्था इथे नाही. ठाणे जिल्ह्यात आमच्याकडे सगळे टायगर आहेत. लोकसभेत जिंकले ही हवा त्यांच्या डोक्यात आहे. ही हवा या निवडणुकीत फुग्यसारखी फुटणार असल्याचा दावाही त्यांनी केला. या निवडणुकीचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा या निवणुकांवर परिणाम होणार असल्याचेही ते म्हणाले.
लोकसभेत मोदींच्या नावावर मत मागितली. शिंदेच्या नावावर नाही मागितले. गाझा पट्टी वरील युद्ध मोदींनी थांबवलं मात्र देशांमध्ये नीटच्या परीक्षेत होणारा गोंधळ आणि पेपर फुटी त्यांना थांबवता आली नाही अशी टीकाही त्यांनी केली.
पावसात पोलीस भरती घेऊ नका असेच सांगितलेले असतानाही तुम्ही पावसात का घेतली? असा सवाल त्यांनी केला.राज्यात कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांचा धाक राहिला नाही, ही परिस्थिती महाराष्ट्रात कधीच तयार झाली नव्हती, असेही ते म्हणाले.