‘शाई’त बुडणाऱ्या गावांची संख्या आता वाढणार

By admin | Published: April 17, 2017 04:51 AM2017-04-17T04:51:30+5:302017-04-17T04:51:30+5:30

शाई धरणाविरोधात सुरू असलेल्या संघर्षाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी पाणीसाठा वाढवण्याच्या दृष्टीने या धरणाची जागा बदलण्यासाठी जोरदार

Now the number of villages falling in ink will increase | ‘शाई’त बुडणाऱ्या गावांची संख्या आता वाढणार

‘शाई’त बुडणाऱ्या गावांची संख्या आता वाढणार

Next

सुरेश लोखंडे, ठाणे
शाई धरणाविरोधात सुरू असलेल्या संघर्षाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याऐवजी पाणीसाठा वाढवण्याच्या दृष्टीने या धरणाची जागा बदलण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. शहापूर तालुक्यातील नामपाडाऐवजी सहा किमीवरील उमगाच्या दिशेने ढाड्रा गावाजवळ धरण बांधण्याचा नवा प्रस्ताव मंजूर झाला आहे. यामुळे ५५ ऐवजी सुमारे ६५ गावपाड्यांना या धरणात जलसमाधी मिळणार आहे.
धरणाची जागा बदलवून दोन पाडे वाचवत असल्याचा गवगवा शासन करीत आहे; पण त्या बदल्यात उगमाकडील १० मोठमोठ्या महसुली गावांना या नव्या प्रस्तावामुळे जलसमाधी मिळणार आहे. यामध्ये शहापूर तालुक्यातील प्रारंभीची ढाड्रा, गुंडा, साकुर्ली, पाचघर मठ येथून ते डोळखांब विभागातील डिहणे, पडगावपर्यंतची ४५ गावे या धरणात बुडणार आहेत. मुरबाड तालुक्यातील शिरोशी, वेळूक आदी १६ महसुली गावे आणि दोन्ही तालुक्यांतील पाडे आदी ६५ ते ६८ गावपाडे नवीन प्रस्तावामुळे शाई धरणात बुडणार आहे. यामुळे शाई धरण शेतकरी संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी संघर्ष तीव्र करीत गावोगाव मेळाव्यांचे आयोजन केल्याचे या संघर्ष समितीचे अध्यक्ष पांडुरंग वारघडे यांनी सांगितले.
शाईच्या जागेत बदल करून धरणाच्या वरच्या दिशेने ढाड्रा गावाजवळ नवीन जागा पाटबंधारे विभागाने निश्चित केल्याची चाहूल या शेतकऱ्यांना लागली आहे. या धरणाची जागा बदलवण्यात आली; मात्र उंची १८० फूट कायम ठेवली आहे. यामुळे शाई नदीच्या उगमापर्यंत हे पाणी पसरणार आहे. यात शहापूरच्या पाच मोठ्या ग्रामपंचायतींचे १५ गावपाडे १०० टक्के बुडणार, तर मुरबाडचे १३ गावे व पाडे बुडणार आहेत. शेतकऱ्यांच्या मालकीची सुमारे तीन हजार ४० हेक्टर शेती बुडणार आहे. वनखात्याचे सुमारे ५०० हेक्टर क्षेत्रातील जंगल बुडणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या पाणीपुरवठ्यासाठी एमएमआरडीए सुमारे ४५२ कोटी खर्चून शाई धरण बांधणार आहे. पण, सुमारे १० वर्षांपासून शेतकऱ्यांनी त्याविरोधात तीव्र संघर्ष सुरू ठेवला आहे. सध्या या धरणाच्या मालकीसाठी ठाणे महापालिका आघाडीवर आहे. वाढीव पाणीसाठा करण्यासाठी या धरणाची मूळ जागा बदलून नव्या जागेचा प्रस्ताव करण्यात आल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे; पण १४ छोटी बंधारे बांधण्याची तयारी दाखवणाऱ्या या शेतकऱ्यांनी शाई धरणाचा विरोध कायम ठेवला आहे.

Web Title: Now the number of villages falling in ink will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.