आता सोशल मीडियावर प्रचार
By Admin | Published: October 30, 2015 11:58 PM2015-10-30T23:58:16+5:302015-10-30T23:58:16+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील जाहीर प्रचार संपुष्टात आल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी छुपा प्रचार करण्याचे निश्चित केले आहे.
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील जाहीर प्रचार संपुष्टात आल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी छुपा प्रचार करण्याचे निश्चित केले आहे. व्हॉटसअप, फेसबुक व टिष्ट्वटर यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यात येत असल्याचे समजते.
सभा, प्रचारफेऱ्या, रोड शो यांनी गेली १८ दिवस कल्याण-डोंबिवलीत प्रचाराची राळ उडाली होती. शुक्रवारी प्रचार संपल्याने कार्यकर्त्यांनी श्वास टाकला असला तरी आता व्हॉटसअप, फेसबुक व टिष्ट्वटरवर प्रचार करण्याचे मनसुबे कार्यकर्त्यांनी रचले आहेत. अशा पद्धतीचा प्रचार अल्पावधीत व्हायरल होत असल्याने अनेक सभा व रोड शो करून जी गोष्ट मतदारांच्या मनावर बिंबवता येत नाही ती ठसवण्याची संधी प्राप्त होते.