आता बदलापूरकरांसाठी हक्काचे जलशुद्धीकरण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:42 AM2021-08-26T04:42:41+5:302021-08-26T04:42:41+5:30

बदलापूर : वाढत्या बदलापूर शहरासाठी वाढीव पाण्यासोबतच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची गरज होती. ती अखेर पूर्ण झाली असून, ...

Now the right water purification center for Badlapurkars | आता बदलापूरकरांसाठी हक्काचे जलशुद्धीकरण केंद्र

आता बदलापूरकरांसाठी हक्काचे जलशुद्धीकरण केंद्र

Next

बदलापूर : वाढत्या बदलापूर शहरासाठी वाढीव पाण्यासोबतच त्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची गरज होती. ती अखेर पूर्ण झाली असून, खरवई परिसरात उभारलेल्या साडेसात एमएलडी क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन बुधवारी आमदार किसन कथोरे यांच्याहस्ते करण्यात आले.

बदलापूर शहरासाठी वाढीव पाण्यासाठी नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम कराव येथे सुरू होते. मात्र ते पूर्ण होण्यास विलंब लागत होता. त्यामुळे आमदार कथोरे यांनी जीवन प्राधिकरणाला १५ ऑगस्टपर्यंत ते पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्राधिकरणाने या कामाला वेग दिल्याने २५ ऑगस्टला त्याचे केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी बदलापूर शहराचे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय भोईर, माजी नगराध्यक्ष व गटनेते राजेंद्र घोरपडे, जिल्हा चिटणीस प्रशांत कुलकर्णी, नगरसेवक शरद तेली नगरसेवक रमेश सोळसे उपस्थित होते.

........

अंबरनाथ-बदलापूरसाठी स्वतंत्र व्यवस्था

बॅरेज धरणावरील जलशुद्धीकरण केंद्रातून अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन्ही शहरांना पाणीपुरवठा होतो. आता खरवई येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र झाल्याने बदलापूरला स्वतंत्र पाणीपुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्राचा अप्रत्यक्ष फायदा अंबरनाथ शहरालादेखील होणार आहे. बॅरेज धरणमध्ये जलशुद्धीकरण केल्यानंतर अंबरनाथसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा आणि बदलापूरसाठी बॅरेज व खरवाई येथून स्वतंत्र पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

-------------

Web Title: Now the right water purification center for Badlapurkars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.