पायाभूत परीक्षा आता शाळाच घेणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 02:06 AM2018-03-26T02:06:19+5:302018-03-26T02:06:19+5:30
विद्यार्थ्यास गेल्या वर्गाचा अभ्यासक्रम कितपत लक्षात आहे, याची चाचपणी करणारी पायाभूत व मूल्यमापन चाचणी परीक्षा शासन
सुरेश लोखंडे
ठाणे : विद्यार्थ्यास गेल्या वर्गाचा अभ्यासक्रम कितपत लक्षात आहे, याची चाचपणी करणारी पायाभूत व मूल्यमापन चाचणी परीक्षा शासन पातळीवर म्हणजे महाराष्टÑ विद्या प्राधिकरणाव्दारे घेतली जात असे. दुसरी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना द्यावी लागत असे. ही परीक्षा आता शालेय पातळीवर घेण्याचे आदेश जारी करण्यात आले. यामुळे प्रश्न पत्रिका कमी मिळाल्यास, झेरॉक्स करताना पेपर फुटला आदी उद्भवणाऱ्या समस्या आणि मनस्तापातून प्रशासन मुक्त झाले आहे.
विद्यार्थ्यांना १ ली ते ८ वीच्या वर्गातील अभ्यासक्रमावर पायाभूत व मूल्यमापन चाचणी परीक्षा द्यावी लागत असे. इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाºया या परीक्षेव्दारे त्यांना गेल्या वर्गातील अभ्यासक्रम कितपत ज्ञात आहे, याची चाचपणी करण्यात येत असे. तोंडी व लेखी परीक्षेच्या माध्यमातून हे मूल्यमापन होत असे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका झेरॉक्सच्या दुकानावर विद्यार्थ्यांना आदल्या दिवशीच विकत मिळायच्या. या परीक्षा कालावधीत होणारी बदनामी आता टळल्याचे शैक्षणिक क्षेत्रात ऐकायला मिळते.
२०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील संकलित मूल्यमापन २ या चाचणीचे आयोजन राज्यस्तरावरून करण्यात येणार नाही. या मूल्यमापन चाचणीचे नियोजन शाळास्तरावर करण्याचे आदेश महाराष्टÑ विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ. सुनिल मार यांनी जारी केले आहेत. प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ कार्यक्रमाव्दारे शालेय शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची ही पायाभूत, मूल्यमापन चाचणी राज्यस्तरावरून घेण्यात येत असे. आता ही जबाबदारी संबंधित शाळांवर देण्यात आली आहे.