ठाणे जिल्ह्यातील बालकांच्या लसीकरण नोंदणीसाठी आता 'यू विन ॲप'चा वापर

By सुरेश लोखंडे | Published: July 30, 2023 01:47 PM2023-07-30T13:47:18+5:302023-07-30T13:47:29+5:30

या ॲपमध्ये लाभार्थी स्वतः नोंदणी करून जवळच्या लसीकरण केंद्रामध्ये लस घेऊ शकणार आहेत.

Now using 'U Win App' for vaccination registration of children in Thane district | ठाणे जिल्ह्यातील बालकांच्या लसीकरण नोंदणीसाठी आता 'यू विन ॲप'चा वापर

ठाणे जिल्ह्यातील बालकांच्या लसीकरण नोंदणीसाठी आता 'यू विन ॲप'चा वापर

googlenewsNext

ठाणे - जिल्ह्यातील एकही बालक लसीकरण विना राहू नये व बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता 'यू विन ॲप'वर नोंद केल्यानंतर बालकांचे लसीकरण होणार आहे. हा उपक्रम प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील या 'यू विन ॲप' नोंद उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कर्मचाऱ्यांना १२ व १८ जुलै रोजी प्रशिक्षण देऊन त्याचे धडे दिले आहे. या माहिमेची पहिली फेरी ७ ते १२ ऑगस्ट या दरम्यान पार पडत आहे. 

कोरोनामध्ये लसीकरणानंतर नोंद केलेल्या नागरिकांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त होत होता. त्याच धर्तीवर आता बालकांच्या विविध प्रकारच्या लसीकरणातही लस मिळाल्यानंतर नोंदीत मोबाईलवर 'यू विन पोर्टल'द्वारे संदेश येईल. लसीकरणाशी संबंधित सर्व तपशिलांची नोंद पोर्टल वर केली जाईल. लाभार्थ्यास कोणत्याही राज्यात अथवा जिल्ह्यात लसीकरणाचा लाभ घेताना कोणतीही अडचण येणार नाही. या पोर्टलच्या माध्यमातून एका क्लिकवर लसीकरणाशी संबंधित माहिती मिळेल. 

या ॲपमध्ये लाभार्थी स्वतः नोंदणी करून जवळच्या लसीकरण केंद्रामध्ये लस घेऊ शकणार आहेत.  लसीकरण लाभार्थ्यांचे आशा व ए. एन. एम, एमपीडब्ल्यू सुद्धा पुर्व नोंदणी करू शकणार आहेत. लसीकरणादिवशी ही लसीकरण केंद्रावर नोंदणी करता येणार आहे. या 'यू विन ॲप'चा वापर करून जिल्ह्यातील सर्व बालकांचे लसीकरण वेळेत होण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी  मनुज जिंदल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी केले आहे. 

महत्त्वपूर्ण -
या प्रणालीसाठी ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर बालकांचे लसीकरण करण्यासाठी जाताना पालकांनी 'यू विन ॲप'वर नोंदणीसाठी मातेचे आधारकार्ड, आधारकार्ड लिंक असलेले मोबाईल नंबर सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे. या प्रणालीद्वारे लसीकरणाच्या तारखा लक्षात ठेवण्याचीही गरज राहणार नाही. मोबाईलवरील मेसेजद्वारे समजू शकणार आहेत.

Web Title: Now using 'U Win App' for vaccination registration of children in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.