ठाण्यातील एन.आर.बी. बंद कंपनीला आग; तासाभराने आग नियंत्रणात
By अजित मांडके | Published: October 31, 2023 10:02 PM2023-10-31T22:02:05+5:302023-10-31T22:02:34+5:30
बेथनी हॉस्पिटल जवळ असलेल्या एन आर बी ही कंपनी बंद पडली असून ती तळ अधिक एक मजली आहे.
ठाणे: पोखरण रोड नं. ०२ येथील बेथनी हॉस्पिटल जवळ असलेल्या एन.आर.बी. या बंद पडलेल्या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लागली. ही आग जवळपास तासाभराने नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
बेथनी हॉस्पिटल जवळ असलेल्या एन आर बी ही कंपनी बंद पडली असून ती तळ अधिक एक मजली आहे. या कंपनीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या भंगार आणि साहित्याला आग लागल्याची मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेत, तातडीने त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर एक तासांनी त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.यावेळी ०१- हायराईज वाहन, ०२- फायर वाहन, ०१- जंबो टँकर, ०१- वॉटर टँकर व ०१ - रेस्क्यु आदी पाचारण केले होते. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.