नाभिक संघटनेचे २२० समाजबांधवांना साहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:52+5:302021-06-02T04:29:52+5:30
डोंबिवली : नाभिक समाज संघटना डोंबिवलीच्या वतीने डोंबिवली समाजबांधवांना धान्य वाटपाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. या कार्यक्रमादरम्यान २२० ...
डोंबिवली : नाभिक समाज संघटना डोंबिवलीच्या वतीने डोंबिवली समाजबांधवांना धान्य वाटपाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. या कार्यक्रमादरम्यान २२० कामगार, मालकांना महिनाभराचे शिधावाटप करण्यात आले. एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ या ब्रीदवाक्याला अनुसरून डोंबिवलीतील नाभिक समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम हाती घेतला.
कोरोना या जागतिक महामारीच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन घोषित झाले; परंतु याची सर्वात जास्त झळ नाभिक समाजाला बसली. या समाजाला त्यांचा पारंपरिक व्यवसाय करता येत नसल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता निर्बंध १५ जूनपर्यंत वाढवले आहेत. समाजातील उपेक्षित लोकांना सरकारकडून कोणत्याही स्वरूपाचे सहकार्य मिळत नव्हते, त्याचप्रमाणे सरकार सलून दुकानेसुद्धा उघडण्यास परवानगी देत नव्हते. अशा वेळेस समाजबांधवांना मदत म्हणून हा धान्य वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाभिक समाज संघटना डोंबिवलीचे पदाधिकारी प्रकाश (बाळा) पवार, मंगेश पोफळे, रमेश राऊत, अशोक आतकरे, संजय गायके आदींसह सदस्यांनी मोलाची भूमिका पार पाडली.