नाभिक, वृत्तपत्र विक्रेत्यांना धान्यवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:59+5:302021-05-14T04:39:59+5:30
ठाणे : लॉकडाऊनमुळे नाभिक व्यावसायिक, वृत्तपत्र विक्रेते, रिक्षाचालक आदी हातावर पोट असणाऱ्या बारा बलुतेदारांवर बेरोजगारीमुळे उपासमार ओढवली आहे. शासनाकडून ...
ठाणे : लॉकडाऊनमुळे नाभिक व्यावसायिक, वृत्तपत्र विक्रेते, रिक्षाचालक आदी हातावर पोट असणाऱ्या बारा बलुतेदारांवर बेरोजगारीमुळे उपासमार ओढवली आहे. शासनाकडून मदत मिळाली नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. आमदार संजय केळकर हे वर्षभरापासून त्यांना विविध माध्यमांतून मदत करीत आहेत. त्यांच्यातर्फे नाभिक कामगार व वृत्तपत्र विक्रेते यांना नुकतेच धान्यवाटप करण्यात आले.
केळकर विश्वस्त असलेल्या समतोल फाउंडेशन या संस्थेमार्फत हे धान्यवाटप समतोलच्या चरई येथील कार्यालयात करण्यात आले. या वेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव, भाजप व्यापारी आघाडीचे ठाणे शहर अध्यक्ष मितेश शाह उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुकाने बंद असल्याने नाभिक कारागिरांवर संकट कोसळले आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांवरही बिकट परिस्थिती ओढवली आहे. या जाणिवेतून केळकर यांनी तातडीने २०० नाभिक कारागिरांना व ५० वृत्तपत्र विक्रेत्यांना तातडीने धान्यवाटप केले.