मद्यपी चालकांची संख्या वाढतीच
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 07:57 PM2018-01-02T19:57:36+5:302018-01-02T19:58:01+5:30
मीरा-भाईंदर परिसरात मद्यपान करून वाहन चालवणा-या ७८ चालकांविरुद्ध थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून, २०१६च्या तुलनेत मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे.
मीरा रोड - मीरा-भाईंदर परिसरात मद्यपान करून वाहन चालवणा-या ७८ चालकांविरुद्ध थर्टी फर्स्टच्या रात्री वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असून, २०१६च्या तुलनेत मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. या शिवाय वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले म्हणून ७२१ चालकांकडून विविध दंड आकारणी करण्यात आली आहे.
२०१६च्या थर्टी फर्स्ट रात्री वाहतूक पोलिसांनी ४५ मद्यपी वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली होती. कारण पोलिसांनी आधीपासूनच कठोर कारवाई हाती घेतली होती. पण यंदा मात्र थर्टी फर्स्ट या एका रात्रीच ७८ मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली. तर वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघन केले म्हणून ७२१ वाहन चालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
१ डिसेंबरपासून २८ डिसेंबरपर्यंत वाहतूक पोलिसांनी ६१ मद्यपी चालकांवर कारवाई केली होती. सद्या वरसावे भागात महामार्ग व ठाणे - घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी असल्याने तेथे वाहतूक पोलीस सतत ठेवावे लागतात. त्यातच शहरात दोन मोठे धार्मिक महाराजांचे कार्यक्रम असल्याने वाहनांची प्रचंड संख्या पाहता तेथे देखील वाहतुकीच्या नियमनासाठी पोलिसांना लक्ष द्यावे लागले. अन्यथा आणखी कठोर कारवाई झाली असती तर मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढली असती असे सूत्रांचे म्हणणे आहे.