ठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली १०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 09:18 PM2020-03-29T21:18:57+5:302020-03-29T21:31:56+5:30

कळव्यामध्ये याआधी चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यापाठोपाठ आणखी दोन रुग्णांची त्यात भर पडली आहे. हे दोघेही १८ मार्च रोजी अमेरिकेतून ठाण्यात आले होते.

 The number of corona cases increased in Thane has risen to 10 | ठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाली १०

१८ मार्च रोजी परदेशातून दाखल झाले होते

Next
ठळक मुद्देकळव्यातीलच आणखी दोघांना लागण१८ मार्च रोजी परदेशातून दाखल झाले होतेपाच दिवसांनी जाणवू लागली लक्षणे

ठाणे : कोरोना व्हायरसचे रविवारी आणखी दोन रु ग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या आता दहाच्या घरात असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या सूत्रांनी दिली.
कळव्यामध्ये याआधी चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. त्यापाठोपाठ आणखी दोन रुग्णांची त्यात भर पडली आहे. हे दोघेही १८ मार्च रोजी अमेरिकेतून ठाण्यात आले होते. २३ मार्च रोजी त्यांना काही लक्षणे जाणवली. त्यामुळे त्यांना २३ मार्च रोजी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. या दोघांचेही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती ठामपाने दिली आहे.
आतार्पयत १९७४ जणांची तपासणी करण्यात आली आहे. तर कस्तुरबा रु ग्णालयात आतार्पयत ५८ जणांना पाठविले असून त्यातील ३१ जणांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरीत २७ जण देखरेखाली आहेत. पहिला रु ग्ण ठाण्यात आढळून आल्यानंतर कळवा पारिसक नगर भागातील 39 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्यावर खाजगी रु ग्णालयात उपचार सुरु आहेत. परंतु त्याच्या संपर्कात आलेल्या घरातील इतर ९ सदस्यांना पालिकेच्या आरोग्य विभागाने कस्तुरबा रु ग्णालयात पाठविले होते. त्यातील चार जणांचे रिपोर्ट पॉझीटीव्ह आले आहेत. तर उर्वरीत पाच जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. परंतु त्यांनाही देखरेखाली ठेवण्यात आले आहे.
दरम्यान आतापर्यंत पालिकेच्या माध्यमातून २९ मार्च पर्यंत १९७४ जणांची तपासणी केली आहे. यामध्ये ९६९ नागरीक हे परदेशातून आलेले आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या एक हजार पाच जणांचा त्यामध्ये समावेश आहे. आतार्पयत १८६१ जणांना घरीच देखरेखाली ठेवले आहे. तर ५८ जणांना कस्तुरबाला पाठविण्यात आले होते. त्यातील २७ रुग्णांवर कस्तुरबामध्ये तर अन्य दोघांवर मुंबईतील दोन वेगवेगळया खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर पालिकेने तयार केलेल्या विलगीकरण कक्षात आधी दहा संशयीतांना देखरेखाली ठेवण्यात आले होते. त्यात ५३ जणांची भर पडल्यामुळे ही संख्या आता ६३ झाली आहे.

Web Title:  The number of corona cases increased in Thane has risen to 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.