ठाण्यात कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढले, ६९ रुग्णांनी केली आतापर्यंत कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 05:22 PM2020-05-01T17:22:02+5:302020-05-01T17:22:28+5:30
एकीकडे ठाण्यात दिवसागणिक कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शहरात आजच्या घडीला ३०० हून अधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. परंतु दुसरीकडे शुक्रवारी दिवसभरात १० रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे.
ठाणे : एकीकडे ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३०० च्या पार गेली असल्याने ठाणे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. परंतु दुसरीकडे ठाणेकरांना दिलासा देणारी बातमी आता पुढे आली आहे. ठाण्यात आतापर्यंत ६९ रुग्ण कोरोनावर ात करुन ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण बाधित रूग्णांच्या तुलनेत हे प्रमाण २० टक्केपेक्षा जास्त आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून ठाणे शहरातही या विषाणूचा संसर्ग वाढत आहे. आतापर्यंत शहरात ३०० हून रुग्ण आढळले आहेत. लोकमान्य नगर, वागळे इस्टेट, या भागात प्रत्येकी ५० हून अधिक रुग्ण आजच्या घडीला आहेत. तर मुंब्रा, कळवा येथेही रुग्णांची संख्या वाढत आहे. असे जरी असले तरी दुसरीकडे उपचारानंतर रु ग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्यामुळे रूग्णांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. आज पर्यत ६९ जण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गुरुवार पर्यंत ५९ रुग्ण बरे झाले होते. तर शुक्रवारी आणखी १० रुग्ण बरे झाले असून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे.
कोरोनाच्या पाशर््वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोना संशियत रु ग्णांच्या स्वॅब टेस्टींगसाठी वाडिया हॉस्पिटलमध्ये नवीन अत्याधुनिक लॅब सुरू करण्यात आली आहे. तसेच कोव्हीड १९ रु ग्णांवर उपचार करणेसाठी सध्या जिल्हा सामान्य रु ग्णालय ( २७८ खाटा ) व होरॉयझन रु ग्णालय ( ५० खाटा ) कौशल्या हॉस्पीटल आणि वेदांत रु ग्णालय कोव्हीड १९ रूग्णालये म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत. या व्यतिरिक्त काळसेकर रु ग्णालय देखील वाढविण्यात आले आहे. तर बेथनी रु ग्णालय ( ५० खाटा ) हे कोमॉरबीड कोरोना संशियत रु ग्ण दाखल करणे व उपचार करणे यासाठी कार्यान्वित आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोव्हिड पॉझीटिव्ह लक्षणे असणाऱ्या रु ग्णांना शहरातील सफायर हॉस्पिटलसह हॉटेल लेरिडा, हॉटेल जिंजर आणि भार्इंदरपाडा येथील डी बिल्डींगमध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येते.
या सर्व रु ग्णालयात बाधित रु ग्णांसाठी आयसोलेशनची प्रभावी यंत्रणा, योग्य उपचार पद्धती आदी उपाययोजनामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होवून बाधित रु ग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. एकूणच ठाण्यातील परिस्थिती समाधान कारक असून जास्तीत जास्त बाधित रु ग्ण बरे होत आहेत.