जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या थोडी घटली, ५,५६६ नवे रुग्ण तर ३३ दगावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 09:51 PM2021-04-14T21:51:42+5:302021-04-14T21:51:54+5:30
ठाणे शहर परिसरात १६७७ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख हजार ३४१ झाली आहे. शहरात ६ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ५२५ झाली आहे
ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग थोडा मंद झाल्याचे दिसले तर मृत्यूदर वाढलेला दिसत आहे. बुधवारी ५५६६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता ३ लाख ९५ हजार ६९० रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात ३३ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या ६ हजार ७९४ झाली आहे.
ठाणे शहर परिसरात १६७७ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता १ लाख हजार ३४१ झाली आहे. शहरात ६ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ५२५ झाली आहे. पाठोपाठ कल्याण - डोंबिवलीतही संख्या वाढतेच असून याठिकाणी १३९० रुग्णांची वाढ झाली असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत ११०९ रुग्णांची वाढ झाली असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये २४१ रुग्ण सापडले असून २ मृत्यूची नोंद झाली आहे. भिवंडीत ७२ बाधीत असून मृत्यूची नोंद नाही. मीरा भाईंदरमध्ये ३७1 रुग्ण आढळले असून ७ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये ३५९ रुग्ण आढळले असून ३ जनाच्या मृत्यू नोंद आहे. बदलापूरमध्ये २१९ रुग्णांची नोंद झाली असून ४ मृत्यूची नोंद जाली. ठाणे ग्रामीणमध्ये १२७ नवे रुग्ण वाढले आहेत. तर २ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. आता बाधीत रुग्णसंख्या २२ हजार ६२३ झाली असून आतापर्यंत ६२४ मृत्यूंची नोंद आहे.