कोरोना रुग्णांच्या संख्येत शनिवारी १४०६ ने वाढ, ३४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 06:26 AM2020-08-30T06:26:11+5:302020-08-30T06:26:50+5:30

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ४०६ रुग्ण शनिवारी नव्याने आढळल्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख २१ हजार ५३८ झाली आहे. तर, ३४ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात तीन हजार ४८९ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे.

The number of corona patients increased by 1406 on Saturday, 34 people death | कोरोना रुग्णांच्या संख्येत शनिवारी १४०६ ने वाढ, ३४ जणांचा मृत्यू

कोरोना रुग्णांच्या संख्येत शनिवारी १४०६ ने वाढ, ३४ जणांचा मृत्यू

Next

ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ४०६ रुग्ण शनिवारी नव्याने आढळल्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख २१ हजार ५३८ झाली आहे. तर, ३४ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात तीन हजार ४८९ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात शनिवारी २४० नवे रुग्ण सापडल्यामुळे या शहरात आतापर्यंत कोरोनाच्या २५ हजार ५१३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, सात जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ८२६ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत आज ३४६ रुग्ण आढळले. येथे आता २८ हजार २७४ बाधित झाले आहेत. उल्हासनगरला ३५ रुग्ण आढळले आहेत. भिवंडी महापालिका क्षेत्रात १६ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत चार हजार १६८ बाधित झाले आहेत. आज एकाही मृताची नोंद झाली नाही.

वसई-विरारमध्ये
चार रुग्णांचा मृत्यू
वसई-विरार शहरात शनिवारी दिवसभरात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच दिवसभरात १४९ नवे रुग्ण आढळून आले आहेत.

तीन लाख नागरिकांचे क्वारंटाइन पूर्ण
नवी मुंबई : कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ३ लाख ७० हजार ५७३ नागरिकांना क्वारंटाइन केले असून, ३ लाख १३०८ जणांचे क्वारंटाइन पूर्ण झाले आहेत.

५४९ नवीन रुग्णांची नोंद
अलिबाग : जिल्ह्यात शनिवारी
५४९ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात शनिवारी बाधित रु ग्णांची संख्या १९ हजार २१५ वर पोहोचली आहे.

Web Title: The number of corona patients increased by 1406 on Saturday, 34 people death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.