ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या ९० हजार पार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 01:15 AM2020-08-04T01:15:35+5:302020-08-04T01:15:58+5:30
सोमवारी १,३२८ नवे रुग्ण सापडले : आरोग्य विभागाने दिली माहिती
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ३२८ नव्या रुग्णांची सोमवारी वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ९० हजार १५४ वर गेली. तर, ३४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या दोन हजार ४८१ झाली.
ठामपा हद्दीत कोरोनाचे २६७ रुग्ण सोमवारी नव्याने आढळले. यामुळे रुग्णसंख्या १९ हजार ९३९ झाली, असून चौघांच्या मृत्यूने सोमवारपर्यंत ६५७ मृत्यूंची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ३७४ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर १० जणांचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णसंख्या २० हजार ९०७ झाली आहे. उल्हासनगरात चार जणांचा मृत्यू झाला असून ५९ नवे रुग्ण आढळले. यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या १४२ झाली असून सहा हजार ९४४ बाधितांची संख्या झाली आहे. भिवंडीला २२ रुग्ण नव्याने आढळले, तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. येथे आतापर्यंत बाधित तीन हजार ६७१ तर मृत्यूंचा आकडा २०५ झाला आहे. मीरा-भार्इंदरला १२९ नव्या रुग्णांची भर पडली असून तिघांचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या आठ हजार ७३७ तर मृतांची २८७ झाली.
अंबरनाथमध्ये ५५ जण आढळले. चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आता बाधित तीन हजार ९३७ तर मृत्यू १५६ झाले. बदलापूरमध्ये ६४ रुग्ण सापडल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ७४४ झाली असून शहरात चार दिवसांपासून एकही मृत्यू नाही. त्यामुळे मृत्यूंची संख्या ४८ कायम आहे. ग्रामीण भागात ४८ नवे रुग्ण सापडले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांचा आकडा सहा हजार ८४० तर मृत्युसंख्या १६५ झाली आहे.