जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतेय जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 07:48 PM2020-04-15T19:48:37+5:302020-04-15T19:55:56+5:30

एकीकडे ठाणे जिल्ह्यात एकीकडे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत २८ रुग्णांना कोरोनावर मात केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी ही समाधानकारकच बाब म्हणावी लागणार आहे.

The number of patients recovering from corona disruption in the district is increasing. Good news for the district | जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतेय जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी

जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्ण बरे होण्याची संख्या वाढतेय जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी

Next

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रु ग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करीत रुग्ण बरे होण्याची संख्याही आता वाढू लागली आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासाठी ही नक्कीच आनंदाची बातमी मानली जात आहे. ठाण्यात आतापर्यंत तब्बल १२ कोरोना बाधीत रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. तर तिकडे कल्याण डोंबिवलीतही १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ठाणे जिल्ह्यात मागील २४ तासात १७ कोरोनाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ठाण्यात बुधवारी नवीन १४ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात आता एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही २६६ एवढी झाली आहे.
                  ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहे. आता त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसू लागले आहे. परंतु आता ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. ठाणे जिल्ह्यात बुधवारी एका दिवसात १७ नवीन कोरोनाबाधित रु ग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रु ग्णांची आकडेवारी ही २५१ वरुन आता २६६ वर पोहोचली असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महानगर पालिका क्षेत्रात बुधवारी नवीन १४ रुग्ण आढळले असून कोरोनाबाधित रु ग्णांची संख्या ९५ वर पोहोचली आहे.
मागील काही दिवसात ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे. परंतु आता ती काहीशी कमी झाल्याचे दिसत आहे. सोमवारी ३० रुग्णांची भर पडल्यानंतर मंगळवारी त्यात आणखी सात जणांची भर पडली तर बुधवारी यामध्ये १४ रुग्ण वाढल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परंतु ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे एकीकडे कोरोना बाधीतांची संख्या वाढत असतांना दुसरीकडे कोरोनावर मात करुन १२ रुग्ण हे ठणठणीत बरे झाले आहेत. दुसरीकडे कल्याण डोंबिवलीतही कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ही ५७ एवढी असून त्यातील २ रुग्ण मयत झाले आहेत. तर आतापर्यंत १६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झालेले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असतांनाही दुसरीकडे जिल्ह्यासाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावी लागणार आहे.
दरम्यान ठाणे शहरात आजच्या घडीला ९५ जणांना याची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. तर १२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एका नव्या रु ग्णांची नोंद झाली आहे. तेथील रु ग्णाच्या आकडा ५२ वर पोहोचला, तर, डोंबिवलीत दोन रुग्ण आढळले आहेत. येथील आकडा ५७ झाला आहे. तर अंबरनाथ, बदलापूर, भिवंडी मिराभार्इंदर, ठाणे ग्रामीण या भागात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही.

Web Title: The number of patients recovering from corona disruption in the district is increasing. Good news for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.