खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 06:20 PM2020-08-24T18:20:19+5:302020-08-24T18:20:24+5:30

जे रुग्ण गंभीर होत आहेत किंवा ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे ते रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचार न घेता खाजगी रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे.

The number of people receiving treatment for corona in private hospitals increased | खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली

खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली

googlenewsNext

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केलेल्या कोविड रुग्णालयात रुग्णांची संख्या घटत आहे. शहरात रुग्ण वाढीचे प्रमाण कमी झाल्याने कोविड रूग्णालयात रुग्णांची संख्या घटली आहे. तर दुसरीकडे खाजगी रुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेने डेंटल कॉलेज येथे तीनशे बेडचे रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात कोरोनाचा प्रभाव वाढलेला असताना दीडशे ते दोनशे रुग्ण एकाच वेळी उपचार घेत होते. मात्र कोरोनाचा प्रभाव जसजसा घटत गेला तसतसा रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या देखील घटली आहे. त्यासोबतच शहराबाहेरील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.

जे रुग्ण गंभीर होत आहेत किंवा ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होत आहे ते रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचार न घेता खाजगी रुग्णालयाकडे धाव घेत असल्याचे दिसत आहे. आजच्या घडीला अंबरनाथ नगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात 80 ते 85 रुग्णच उपचार घेत आहेत. एकूण रुग्णांच्या टक्केवारीनुसार हा आकडा केवळ 30 टक्क्यांच्या घरात जात आहे. दुसरीकडे खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 115 च्यावर असून त्यांची टक्केवारी 40 टक्क्यांच्या घरात जात आहे. खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पालिकेच्या कोविड रुग्णालयाकडे रूग्णांनी पाठ फिरवली आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान उपलब्ध 300 बेड पैकी दोनशेहून अधिक बेड रिकामे असतानाच अंबरनाथ नगरपालिकेने याच डेंटल कॉलेजमध्ये नव्याने शंभर ते दीडशे बेडची व्यवस्था वाढविण्याचे काम सुरू केले आहे. त्यात काही आयसीयू कक्ष उभारले जात आहे. शिवाजीनगर पोलीस स्टेशन समोरील युपीएससी सेंटरमध्ये देखील ऑक्सीजन यंत्रणा असलेले रुग्णालय उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. भविष्यात ुग्णांची संख्या पुन्हा वाढण्याची शक्‍यता असल्याने ही व्यवस्था केली जात असल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे. मात्र 300 रुग्णांसाठी जी व्यवस्था करण्यात आली आहे तेवढीच व्यवस्था अवघ्या 80 रुग्णांसाठी देखील कार्यालयात असल्याने उपचाराच्या नावावर पालिकेवर आर्थिक भुर्दंड पडत असल्याचे दिसत आहे. 

Web Title: The number of people receiving treatment for corona in private hospitals increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.