छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाती नर्सेसचे काम बंद आंदोलन, स्टाफ वाढविण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 04:38 PM2022-01-24T16:38:38+5:302022-01-24T16:38:46+5:30
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात सोमवारी येथील स्टाफ नर्सेसने अचानक काम बंद आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांतील स्टाफ नर्सेसने सोमवारी अचानक काम बंद आंदोलन केले. कमी स्टाफ असतांना नवीन आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याची भुमिका रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. परंतु आधीच स्टाफ कमी असल्याने त्यासाठी स्टाफ कुठुन द्यायचा असा सवाल करीत या नर्सेसने हे काम बंद आंदोलन केले होते. नवीन स्टाफ घेण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात सोमवारी येथील स्टाफ नर्सेसने अचानक काम बंद आंदोलन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला. १९९२ पासून आम्ही येथे काम करीत आहोत. मागील दोन वर्षापासून कामाचा ताण अधिक वाढला आहे. अनेक नर्सेस सेवा निवृत्त झालेल्या आहेत, अनेकांनी कामाचा ताण सहन होत नसल्याने सोडलेले आहे. तर काही सेवानिवृत्तीच्या मार्गावर असलेल्या नर्सेसांना देखील आजही डबल डय़ुटी करावी लागत आहे. कोरोनात ७० नर्सेस कोरोना पॉझीटीव्ह झाल्या होत्या.
त्यानंतर आता देखील अनेक नर्सेसेंना कोरोनाची बाधा होत आहे. परंतु, पाच दिवसांची सुट्टी देऊन पुन्हा कामावर हजर राहण्यास सांगितले जात आहे. रुग्णांची काळजी आम्ही घेतो, आमची काळजी घेणारे येथे कोणीच नसल्याची भावना या आंदोलनकत्र्या नर्सेसेने व्यक्त केली. प्रशासनाकडे वारंवार स्टाफ वाढविण्याची मागणी केली जात आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वॉर्डबॉयच्या लेव्हलचा पगार येथील नर्सेसनां मिळत आहे. लादी तुटली तरी देखीस स्टॉफला जबाबदार धरले जात आहे.
त्यात आता स्टाफ कमी असतांना आयसोलेशन वॉड तयार करण्याचा निर्णय रुग्णालयाने घेतला आहे. परंतु त्यासाठी स्टाफ कुठुन आणायचा, आधीच प्रत्येक विभागात स्टाफ कमी असतांना येथे स्टाफ कसा द्यायचा असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. हे आंदोलन करतांना कुठेही रुग्ण सेवा बंद करण्यात न आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.