पंधरा दिवस पूर्ण! अंगणवाडीत शिजलाच नाही पोषण आहार; सेविकांच्या बेमुदत संपाचा परिणाम

By सुरेश लोखंडे | Published: December 18, 2023 06:00 PM2023-12-18T18:00:46+5:302023-12-18T18:02:55+5:30

ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलेला आहे.

Nutritional food is not cooked in Anganwadi As a result of indefinite strike by the servants | पंधरा दिवस पूर्ण! अंगणवाडीत शिजलाच नाही पोषण आहार; सेविकांच्या बेमुदत संपाचा परिणाम

पंधरा दिवस पूर्ण! अंगणवाडीत शिजलाच नाही पोषण आहार; सेविकांच्या बेमुदत संपाचा परिणाम

ठाणे : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गमभागातील अंगणवाडी केंद्रातील बालके, कुपोषित बालकांना रोचा ताजा, गरम व पोषण आहार मिळत नसल्यामुळे त्यांनी आबळ होत असल्याचे निदर्शनात आले आहे. 

एकात्मिक बालविकास सेवा योजनेव्दारे जिल्ह्यातील शहरांमधील व ग्रामीण, दुर्गम गांवखेड्यातील अंगणवाड्यांमध्ये सेविका व मदतनीस बालकांसाठी सतर्क आहेत. या बालकांसह केंद्रातील कुपोषित बालकांच्या औषधोपचाराची काळजी या सेविका, मदतनीस घेत आहे. त्यामुळे कुपोषण कमी होण्यास मोठा हातभार लागलेला आहे. पण त्यांच्या आवश्यक मागण्यांसाठी शासन लक्ष देत नसल्यामुळे त्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्यस्तरीय संप आझााद मैदानावर सुरू आहे. या बेमुदत संपाचा आजचा १५ दिवस आहे. या कालावधीत राेज मिळणाऱ्या पोषण आहारापासून ही बालके, गरोदर माता या ताज्या, गरम पोषण आहारापासून वंचित आहेत.

या अंगणवाडी सेविका दरदिवशी ३ ते ६ वयोगटातील लाभार्थी बालकांना ताजा गरम आहार शिजवून देत होत्या. पण अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाभार्थ्यांच्या तोंड पोषण आहार थांबला आहे. त्यांचे रोजचे वजन, उंची होत नसल्यामुळे कुपोषणाची खरी माहिती शासनापर्यंत पोहचत नाही. प्रशासनाने केलेल्या उपाययोजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे या बालकांचे १५ दिवसाच्या कालावधीत लाथार्थ्यांचे मोठे हाल झाले आहे. याविषयी ठाणे जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी संजय बागुल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे जिल्ह्यातील पोषण आहार वाटपात मोठ्या प्रमाणात खंड झा‘ल्याचे उघड होत आहे.

Web Title: Nutritional food is not cooked in Anganwadi As a result of indefinite strike by the servants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे