OBC Reservation: ठाण्यात ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं चक्काजाम आंदोलन; दरेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 01:48 PM2021-06-26T13:48:32+5:302021-06-26T13:50:47+5:30

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलन

OBC Reservation BJP agitates for OBC reservation in Thane | OBC Reservation: ठाण्यात ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं चक्काजाम आंदोलन; दरेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ताब्यात

OBC Reservation: ठाण्यात ओबीसी आरक्षणासाठी भाजपचं चक्काजाम आंदोलन; दरेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते ताब्यात

Next

ठाणे: ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शनिवारी भारतीय जनता पक्षाने राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारले आहेे. त्यातच ठाण्यात ही भाजपने चक्काजाम आंदोलन करून राज्य सरकारने रद्द केलेल्या ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचा जाहीर निषेध केला. यावेळी भाजप असंख्य पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली तसेच ठाणे शहर पोलिसांनी विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर आणि जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनात महिला वर्ग ही मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी दरेकर यांनी सरकार टीका करत ओबीसी नेते आरक्षण सुरक्षित ठेवू शकत नसतील तर त्या दोन नेत्यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

ठाण्यातील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील ज्ञानसाधना कॉलेज समोर रेल्वे उड्डाणपुलावर ओबीसी आरक्षण महाराष्ट्र सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजप ठाणे शहर जिल्ह्यातर्फे  विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाध्यक्ष आ निरंजन डावखरे व आ संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार सकाळी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासह ठाण्यात आणखी ७ ते ८ ठिकाणी भाजपने चक्काजाम आंदोलन केले. याप्रसंगी भाजपचे प्रदेश पदाधिकाऱ्यांसह ठामपा नगरसेवक - नगरसेविका आणि स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी आंदोलनाकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमधून पोलीस ठाण्यात नेले.

ओबीसींच्या दोन मंत्र्यांनी राजीनामा द्यावा- दरेकर
महाविकास आघाडीचे सरकार मराठा पाठोपाठ ओसीबीचे आरक्षण देऊ शकत नसल्याने हे फेल सरकार आहे. ओबीसी आरक्षणाला राज्य सरकार जबाबदार असून या आरक्षणाबाबत केंद्र सरकारचा काही संबंध नाही. ओबीसी आरक्षणासाठी जे सत्तेत आहे त्याच्यातील काँग्रेस पक्ष जर आंदोलन करणार असेल तर ती त्यांची निव्वळ नौटंकी आहे.त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून कॅबिनेट किंवा अधिवेशनात हा विषय घ्यावा. तसेच ओबीसीचे नेते असलेले कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षण सुरक्षित करावे अन्यथा राजीनामा द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. तसेच ओबीसी समाजाला न्याय मिळवून दिल्याशी भाजप स्वस्त बसणार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असून वेळप्रसंगी याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असेही म्हणाले. तसेच ईडीची कारवाई ही आकसापोटी केली आहे असा आरोप केला जात असा प्रश्न विचारताच दरेकर यांनी कर नाही तर डर कशाला असे म्हणून मग काळजी करायचे काय कारण. त्यांनी चौकशीला सामोरे जाऊ नसेल तर न्याय व्यवस्था आहे आपल्याकडे असेही म्हटले.

Web Title: OBC Reservation BJP agitates for OBC reservation in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.