ओबीसी ,एसटी आणि एसएसी ही वर्गवारी रद्द करुन स्वतंत्र आयोग नेण्यात यावा, गोर अभ्यासक आरजूनिया भुकिया यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 08:31 PM2018-03-30T20:31:37+5:302018-03-30T20:31:37+5:30

भारतीय संविधानातील तरतूदीनुसार घटक राज्यात ओबीसी, एसटी, एससी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही वर्गवारी रद्द करुन त्यासाठी एकच आयोग नेण्यात यावा अशी मागणी गोरसमाजाचे अभ्यासक आरजुनिया सितीया भुकिया यांनी केली आहे.

OBC, ST and SAC can be canceled and independent commission should be taken, demanded by Gore-scholar Arjunia Bhukia | ओबीसी ,एसटी आणि एसएसी ही वर्गवारी रद्द करुन स्वतंत्र आयोग नेण्यात यावा, गोर अभ्यासक आरजूनिया भुकिया यांची मागणी

ओबीसी ,एसटी आणि एसएसी ही वर्गवारी रद्द करुन स्वतंत्र आयोग नेण्यात यावा, गोर अभ्यासक आरजूनिया भुकिया यांची मागणी

Next

 डोंबिवली - भारतीय संविधानातील तरतूदीनुसार घटक राज्यात ओबीसी, एसटी, एससी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही वर्गवारी रद्द करुन त्यासाठी एकच आयोग नेण्यात यावा अशी मागणी गोरसमाजाचे अभ्यासक आरजुनिया सितीया भुकिया यांनी केली आहे.

आॅल इंडिया बंजारा सेवा संघ, भारत यांच्यातर्फे पाचव्या अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलनाचे येथील सावित्रीबाई फुले नाटयगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुकिया बोलत होते. या संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात विचारवेध ,बंजारा गीतमाला, ओबीसी आरक्षण विभाजन महाचर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. गणेश चव्हाण, संमेलन स्वागताध्यक्ष शंकर पवार,विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड, एआयबीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू नाईक, नागपूर महाविद्यालयातील प्रिन्सीपल डॉ. गणेश चव्हाण, संतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

भुकिया म्हणाले, बंजारा भाषेला कोणत्याही वर्गवारीत न टाकता त्यासाठी एक स्वतंत्र आयोग नेमला जावा. त्यासाठी भारत सरकाराच्या भाषा विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. २०१६ मध्ये नरेंद्र मोदींना भेटून त्यांच्याकडे मसूदा सुपुर्द केला आहे, असे सांगितले.
शंकर पवार यांनी सांगितले, बंजारा समाजाचे चांगले साहित्य निर्माण झाले पाहिजे. या समाजात एकी दिसून आली पाहिजे. त्यासाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संघटनेने एकत्र येऊन काम केले पाहिजे. समाजातील नेतेमंडळीनी पुढाकार घेऊन गरजू मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली पाहिजे.
राजू नाईक म्हणाले, बंजारा समाजाचा जागतिक स्तरावर कोणताही धर्म नाही. या समाजाला जागतिक स्तरावर धर्म म्हणून स्वतंत्र स्थान मिळाले पाहिजे. राजकारणात लोकसभेप्रमाणे राज्यसभेत बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. बंजारा समाजाचे साहित्य इंग्रजी भाषेतून निर्माण झाले पाहिजे. व त्याला जागतिक दर्जाचा वाचक निर्माण झाला पाहिजे, असे सांगितले.

प्रत्येक राज्याच्या अभ्यासक्रमात गोर बंजारा भाषेचा समावेश असावा - डॉ. गणेश चव्हाण

विद्यार्थ्यांना गोर बंजारा भाषेचे ज्ञान असावे त्यासाठी प्रत्येक राज्याच्या अभ्यासक्रमात गोर बंजारा बोलीभाषेचा समावेश असावा. केवळ बोलीभाषेचाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास ही तरूणपिढीला समजला पाहिजे. याकरिता त्यांचा ही समावेश अभ्यासक्रमात केला पाहिजे, असे सांगितले.

 कार्यक्रमाच्या चौथ्या सत्रात ओबीसी आरक्षण विभाजन महाचर्चा यावर बोलताना हरिभाऊ राठोड यांनी बंजारा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करावे असे मत मांडल्यामुळे त्यांना प्रेक्षकांमधून कोणीच बोलू दिले नाही. त्यांना स्वतंत्र स्थान पाहिजे आहे.
 
संमेलनातील महत्वाचे ठराव
- गोर बंजारा बोलीभाषेला संविधानाच्या आठव्या सूचीमध्ये भाषेला दर्जा मिळण्यात यावा
- महापुरूषांच्या विचारधारेचे साहित्य निर्मितीसाठी शासनाने मदत करावी.
- समाजामधील वाढती हुंडा पध्दतीसाठी शासनाचे विविध कार्यक्रम व योजना राबविण्यात यावे
- गोर बंजारा बोलीभाषेला मौखिक साहित्य निर्माण करणाºया साहित्यीकांना मानधन व प्रवासभत्ता मंजूर करण्यात यावा.

Web Title: OBC, ST and SAC can be canceled and independent commission should be taken, demanded by Gore-scholar Arjunia Bhukia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.