एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे उद्दिष्ट

By admin | Published: April 19, 2016 02:04 AM2016-04-19T02:04:47+5:302016-04-19T02:04:47+5:30

शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. नवीन बोअरवेलवर चार कोटींचा खर्च अपेक्षित असून भूगर्भातील पाण्याची पातळी ६०० फुटांवर गेल्याची

Objective of 350 bore well by April | एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे उद्दिष्ट

एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे उद्दिष्ट

Next

उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी एप्रिलअखेर ३५० बोअरवेलचे ध्येय पालिकेने ठेवले आहे. नवीन बोअरवेलवर चार कोटींचा खर्च अपेक्षित असून भूगर्भातील पाण्याची पातळी ६०० फुटांवर गेल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवण यांनी दिली.
उल्हासनगर पालिकेकडे स्वत:चा पाणीस्रोत नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात ४५ टक्के कपात केली. पाणीपुरवठ्यापैकी ३५ टक्के गळती होत आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रत्येक प्रभागात बोअरवेल खोदण्यास परवानगी दिली आहे. एका महिन्यात पालिकेने २०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्या असून एप्रिल महिनाअखेर ३५० बोअरवेल खोदण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
तसेच शहरात ६३० जुन्या बोअरवेलपैकी ४०० सुस्थितीत आहेत. त्यापैकी २६० बोअरवेल सुरू असून १०० कायमच्या बंद झाल्या आहेत. तर, ४५ बोअरवेलची दुरुस्ती कंत्राटदाराकडून करून घेतली आहे. त्यामुळे आता पूर्वीच्या तुलनेत पाणी पुरवठ्याची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारेल, अशी आशा नागरिकांमध्ये आहे. (प्रतिनिधी) नदीकिनारी बोअरवेलची मागणी
बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीकिनारी बोअरवेल खोदून त्याद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी स्थानिकांनी आयुक्तांकडे केली आहे. नदीकिनाऱ्यावरील पाणी पिण्यास योग्य असल्याचे मत तज्ज्ञांचे असून स्वत:चा पाणीस्रोत त्यामुळे निर्माण होऊ शकेल. तसेच सेंच्युरी रेयॉन कंपनीजवळील एमआयडीसीचे पंप ताब्यात घेऊन पाणीपुरवठा यंत्रणा उभी करण्याचा मानस अनेक नगरसेवकांनी बोलून दाखवला.

Web Title: Objective of 350 bore well by April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.