रस्ता रुंदीकरणातील बाधित बांधकामे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:40 AM2021-05-10T04:40:23+5:302021-05-10T04:40:23+5:30
कल्याण : पश्चिमेतील उंबर्डेतील रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी ७० बांधकामे शनिवारी तोडण्यात आली. तीन प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी, ...
कल्याण : पश्चिमेतील उंबर्डेतील रस्ता रुंदीकरणात बाधित होणारी ७० बांधकामे शनिवारी तोडण्यात आली. तीन प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांच्या प्रचंड बंदोबस्तात ही कारवाई पार पडली. तोडण्यात आलेल्या बांधकामांमध्ये ११ घरे, चार ढाबे, ४५ दुकाने, पाच संरक्षित भिंती, चार भंगार दुकाने आणि एक सर्व्हिस सेंटर आदींचा समावेश आहे.
उंबर्डेतील कै. आत्माराम भोईर चौक (तलाठी कार्यालय) ते नेटकऱ्या चाैकापर्यंत २४, १८ व १५ मीटर रुंद रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केडीएमसीच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यात काही बांधकामे अडथळा ठरत होती. त्या ७० बांधकामांवर मनपाच्या वतीने कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ब प्रभाग क्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप, अ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत, क प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडदे, उपअभियंता भालचंद्र नेमाडे, कनिष्ठ अभियंता अनिल वांगसकर, प्रकाश मोरे यांसह अ, ब आणि क प्रभागांतील ३० कर्मचाऱ्यांच्या वतीने ही कारवाई केली गेली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. यात महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे १२ पोलीस आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचे दाेन पोलीस अधिकारी आणि २० पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. तीन जेसीबी आणि डम्परच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.
------------------------------------------------------
फोटो आहे